पोस्ट्स

मे, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

स्मृतीबनातून-हे मना...(पद्य)

इमेज
शयनाधीन होण्यापूर्वी काल 'मना'वर लिहिलेल्या कविता, गाणी ऐकत होतो. शरीर झोपी गेलं मात्र ते शब्द, विचार मनात जागे राहिले. आपल्या मनात आदरस्थानी असलेल्या कित्येक थोरा मोठ्यांनी मनावर मनःपूर्वक लिहिलं आहे. मी ही माझं मन मोकळं केलं… हे मना… मनातल्या मनात मी मनासी विचारले सांग ना कसे कुणी तुजला रिझवायचे? कधी जिथे जीवनात धुंदी उपभोगितो मात्र तू तिथेच शूळही भोगितो कधी अकस्मात तू कुणावरी भाळतो अन् कधी तसाच मोहभंग साहतो  कधी संकटातही निर्धार तू दावितो कधी मात्र सुखेही हातपाय गाळीतो कधी तू प्रकाश वेगाने धावतो कधी काळ काळोख जागीच थिजतो  मना, सारे मनात तू ठेवितो समीप राहुनी फार दूर राहतो नितीन सप्रे नवी दिल्ली nitinnsapre@gmail.com   310523

स्मृतीबनातून-प्रीती(पद्य)

इमेज
  प्रीती पाहिजे तू होतास तेव्हा ऐकले हे शब्द जेव्हा चांदण पाऊस आला गात्री मुरून गेला सोबतीस होती मधूरती  गुंफुनी तिच्या हात हाती मुक्त विचरलो पूनव राती फुलून गेली गाभुळ प्रीती लतिकेसम झुलत्या बटांनी क्षेपूनी कटाक्ष नेत्रांनी प्राशुनी प्रीत ओठांनी साधला निर्विकल्प सर्वांगांनी हे खरे? स्वप्न? की आभास? उमजूच नये आपणास पंचप्राण लावूनी पणास साधणार ना मदनास नितीन सप्रे, नवी दिल्ली nitinnsapre@gmail.com 120423

स्मृतीबनातून-आयुष्याचे डाव(पद्य)

इमेज
कधी कधी सकाळी जाग येते तेव्हाच मनात एखाद्या विचाराचा कोंब उगवलेला असतो. आज असच घडलं आणि चहाच आधण ते चहापान होऊन फिरायला बाहेर पडे पर्यंतच्या काळात त्यानं चांगलच बाळसं ही धरलं… आयुष्याचे डाव आता कुठे आयुष्य थोडे उमगायला लागले एकेक त्याचे डाव सारे समजायला लागले. आस धरता तू, कधी सुग्रास भोजनाची योजल्यागत चाखशी तू, चव शिळ्या भाकरीची  सफल संपन्न जीवनाचे मांडे मनात मांडसी विफल विपन्न जगण्याचे भोग भोगावे लागती  लाविसी सारे पणाला साधण्या जर पूर्णता वाकुल्या तुज दाखवेल बेरकी ती अपूर्णता नियतीला घाबरूनी काय जगणे सोडून द्यावे? सुकर्माच्या दौलतीने डाव अवघे उधळून द्यावे नितीन सप्रे nitinnsapre@gmail.com   240523

स्मृतीबनातून - माई री मैं का से कहूँ

इमेज
  माई री मैं का से कहूँ "एक संसारी से प्रीतड़ी, सरै न एकी काम, दुविधा में दोनों गए, माया मिली न राम।" जिसका अर्थ हैं संसार से प्रीत की रीत बडी न्यारी है। संसार से प्रीती मे, कोई काम बनने के असार तो कम, लेकीन दुविधा या भ्रम की स्थिति जरूर बन जाती है। ऐसी दुविधा जनक स्थिती मे अक्सर दोनो, भौतिक और पारमार्थिक लाभ से हाथ धोना पडता है।अत: मनुष्य को अपने जीवन में दुविधा से बचने की कोशिश करनी चाहिए। लेकीन क्या ये इतना आसान है? आइए इस कहानी पर गौर किजिये। कथा शादी के बाद एक बारात दूल्हे की गाव जा रही है। रास्ते मे विश्राम हेतू वह बारात एक जगह रुकती है। संजोग की बात है कि दुल्हन जिस पेड के नीचे बैठी है उसी पेड पर एक भूत है और राहगिरों को लगता है। इस दुल्हन को भी लगने की इच्छा से वो पेड से तो उतर आता है, लेकिन उस निहायत निरागस सुंदरता को देखकर उसके मन मे कुछ अलग भाव पैदा होते है। इसे लगे या ना लगे इस दुविधा मे वो पड जाता है। एक तरफ लगने की कामना तो है, वही दुसरी तरफ ऐसी सुंदरता को कष्ट पहुचाना उसे रास नही आता। एक तरह से देखा जाये तो ये संस्कारी भूत है। वो दुल्हन को नही लगता और बारात आगे...

स्मृतीबनातून-जत्रा(पद्य)

इमेज
  जत्रा   वासनांच्या सरोवरी आकंठ बुडालो मी असा  बंदिस्त व्हावा भ्रमर कमलिनीच्या हृदयी जसा मोहपाशी जत्रेत साऱ्या नकळत सुटला हात त्याचा  भान आले, गेले कितीदा, बोचता पायात काचा जिंकावयाचे आहे मला, हे भवाचे संगर मागणे आहे तयाला, हात दे सत्वर नितीन सप्रे, दिल्ली nitinnsapre@gmail.com   दिवाळी 2022