स्मृतीबनातून-शब्द(पद्य)
शब्द
शब्द डोह शब्द अजर
शब्द व्यापती सकल चराचर
शब्द हे प्राचीन फार
शब्द बहु आहे अपार
शब्द मोह शब्द रूचिर
शब्द कथती सर्व सार
शब्द मृदुल शब्द प्रखर
शब्द सरल शब्द अमर
शब्द करिती प्रेम उद्गार
शब्दांनी होई त्याचा स्वीकार
शब्द जणू कल्पना आकार
शब्द आहे भाषा उच्चार
शब्दास अर्थ आशय विचार
शब्दच हा जीवनी आधार
शब्द असे तो चमत्कार
शब्द मांडती दृढ निर्धार
शब्द आहे ब्रम्हांड सार
शब्दाय नमः शब्द ईश्वर
नितीन सप्रे
नवी दिल्ली
280323
👏👏👏
उत्तर द्याहटवाशब्द तुम्हा प्रिय फार
शब्दांचे तुम्ही जादुगार ll
शब्द कसेही वाकविता
दाखवता त्यांची आर्तता ll
शब्द असती तुमचे गुलाम
तुम्हा माझे लाख प्रणाम ll
©️ माधव मनोहर जोशी.
माधवराव जी आपण केलेल्या कौतुका बद्दल ऋणी आहे. पण शब्द माझे गुलाम नव्हेत तर मीच शब्द दरबारी चा पाणक्या आहे..उत्साह वर्धन केल्या बद्दल धन्यवाद 😊🙏
उत्तर द्याहटवाआणि हो तुम्ही सर्वार्थाने ज्येष्ठ आहात पण त्यामुळे तुम्हाला प्रणाम करण्याचा अधिकार मला आहे तुम्हास नाही. माझा प्रणाम🙏
उत्तर द्याहटवाअहो, नुसते वय वाढल्याने कोणी ज्येष्ठ होत नाही. तुमच्या काव्यातील प्रगल्भता आणि मतितार्थ खरेच अतिशय लोभसवाणा असतो, त्याला मी प्रणाम केला आहे.
हटवानितीनजी नमस्कार शब्दांची तुम्ही बांधलेली पूजा मनापासून आवडली खरं म्हणजे माझ्याकडे शब्दच नाहीत त्याबद्दल काही लिहिण्यासाठी संत तुकाराम महाराजांनी काही वर्षांपूर्वी लिहून ठेवलेला आहे आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने शब्दांचीच शस्त्रे यत्न करू शब्दची आमच्या जीवाचे जीवन शब्द वाटून धनलोका तुका म्हणे पहा शब्दचि हा देव शब्दाची गौरव पूजा करू किती सार्थ शब्द वापरलेत महाराजांनी आणि तुम्ही त्याच शब्दांचा आधार घेत शब्दांवरची एक सुंदर कविता आम्हाला पाठवलीत आम्ही ती ऐकली पाहिली वाचली म्हणून चिंतन केलं खूप छान आवडली मनापासून धन्यवाद
उत्तर द्याहटवा