स्मृतीबनातून - कैवल्य चांदणे(पद्य)

 


कैवल्य चांदणे


या नदीच्या पार तेथे, गाव माझे छानसे

सोडूनी या भव बंधनास मुक्त विसावे असे

कहाण्या सांगू किती, नाही काहीच तिथे उणे

राहूनी दूर 'त्या' पासूनी कष्टावले आता जिणे  


गावात माझ्या वाहती, शुभ्र स्फटिका सम  निर्झरे

तरुराजीत गर्द त्या, कूजती मधू पांखरे

क्षितिज राउळी, निरांजन ते, स्वये भास्कराचे तेवते

शशी तारकांची,  सम शीतल अशी, आभाळमाया दाटते


सांज वेळी खग निघती, परत अपुल्या 

घरट्याकडे

कुडीतल्या पंचप्राणा, जाऊया चल निज धामा कडे

घेऊनी सारा आस्वाद झाला मायेच्या या विभ्रमांचा

दाटेल सुख सर्वत्र जैसा बघशील चेहरा स्वरूपाचा

का शिणवितो जीव हा त्याग ऐहिकाचे भोगणे

एकल परी असावी आस लाभावे कैवल्य चांदणे


नितीन सप्रे

nitinnsapre@gmail.com

2703242237

टिप्पण्या

  1. वा! नितीन जी,
    खूप छान भाव व्यक्त झालेत.
    कैवल्याचे चांदणे ज्यांना लाभतं ते
    भाग्यवंत।
    सुरेख आहे

    उत्तर द्याहटवा
  2. 'मन चलो निज निकेतने' ह्या स्वामी विवेकानंद यांच्या भजनातला भाव अभिव्यक्त करण्याचा प्रयत्न आहे. तुम्ही चपखलपणे ताडला. मन:पूर्वक धन्यवाद.

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

प्रासंगिक- वसंतवैभव-कैवल्य गान

स्मृतीबनातून - देखण्या ‘बाकी’ काव्यपंक्ती

स्मृतीबनातून निरंजनी स्वर-माणिक