स्मृतीबनातून - निशब्द कृती (पद्य)

निशब्द कृती



उघड्या नेत्रांस जाळी दाहकता वास्तवाची 

मिटल्या पापण्यात दाटी भंगलेल्या स्वप्नांची


भरून होते घेतले श्वास त्यांनी अमृताचे

कळेना निःश्वास त्यांचे हे कैसे झाले विषाचे 


अधरांवरचे जे प्राशिले शीतल चांदणे

अवचित त्यांचे कैसे होऊन गेले निखारे


स्पर्शात खास होती अशी जाणीव धुंदगंध

गेला उडून आता तो रासलीलेचा सुगंध


दुखावल्या भावना त्यांच्या निमित्त काही शब्द

केली राख जीवनाची करुनी कृती निशब्द


रूपरंग ऐहीकाचे सारे ते भुलविणारे

हाक देती संग अलौकिकाचे उजळणारे


नितीन सप्रे
nitinnsapre@gmail.com 
230420241140

टिप्पण्या

  1. वा!
    खूप छान कविता. अर्थवाही शब्द. विषेतः अधरांवरी जे प्राशिले शीतल चांदणे
    अवचित कैसे त्यांचे झाले निखारे.
    काही गोष्टींना उत्तरे नसतात,, असली तरी देता येत नाहीत. मग त्या गोष्टी अवचित वाटू लागतात.
    छान नितीन जी

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

प्रासंगिक- वसंतवैभव-कैवल्य गान

स्मृतीबनातून–सुधीर स्वरलालित्य

स्मृतीबनातून - देखण्या ‘बाकी’ काव्यपंक्ती