स्मृतीबनातून - धैर्य(पद्य)
आज सकाळी एका मैत्रिणीशी ओळख विषयावर बोलताना कवी सुरेश भट यांचा उल्लेख झाला. मी त्यांच्यावर पूर्वी लिहिलेल्या ब्लॉग मधल्या त्यांच्याच दीपदान कवितेच्या काही ओळी वाचून दाखवताना माझ्या मनात ही शब्द दाटून आले. त्यांना ओळीत व्यक्त करण्याचा हा प्रयत्न...
धैर्य
बसल्या अश्या झळा शीतल सावल्यांच्या
भेटलो गळा जेव्हा एकेक स्वकियांच्या
कळपात ना कधी शिरलो कुणाच्या
सदा राहिलो म्हणून जवळ कुंपणाच्या
तुडवीत गेले जे सारासार विचारांना
संवेदना विहीन केले त्यांनीच साऱ्यांना
मीच माझे न लिहिले सन्मानपत्र
त्यांनीच अखेरी केला सन्मान सर्वत्र
जगताना इतके विखारी डंख झाले
झाड सोनचंपाचे मीच दारी लावले
कानोसा घेत सर्व दिलासा देत गेले
कृतीशून्य फुकाचे शब्द सर्व ओकून गेले
एकदाच संगरी जीवनाच्या हुतात्मा होऊ घातलो
आप्तांची नव्हे मरणाची वाट पाहू लागलो
कोणी मला जवळ केलेच कोठे?
सोईने कार्य साऱ्यांनी उरकले होते
विपरितात साऱ्या सजवित होतो जीवन सारे
समिरानेच घात केला उधळले चित्र सारे
कळवू नका कुणाला वृत्त हे पराभवाचे
धैर्य अजुनी बाकी तुफान चक्री रोखण्याचे
नितीन सप्रे
nitinnsapre@gmail.com
060820240935
नवी दिल्ली
खूप छान वास्तववादी काव्य
उत्तर द्याहटवाकृतिशून्यफुकाचे शब्दसर्व ओकून गेले,
उत्तर द्याहटवाकिती समर्पक ओळ लिहीलीत तुम्ही।
प्रसिद्ध लेखक व. पु. काळे एका कथेत लिहितात
" ज्या मित्राचं पाकीट मारलं गेलय त्याला कसं मारलं ,कुठे मारलं, तुझं लक्ष कुठे होतं असले प्रश्न विचारू नयेत।सरळ त्याला शक्य तेव्हढी मदत करावी"
छान आहे तुमची कविता।