स्मृतीबनातून - धैर्य(पद्य)


आज सकाळी एका मैत्रिणीशी ओळख विषयावर बोलताना कवी सुरेश भट यांचा उल्लेख झाला. मी त्यांच्यावर पूर्वी लिहिलेल्या ब्लॉग मधल्या त्यांच्याच दीपदान कवितेच्या काही ओळी वाचून दाखवताना माझ्या मनात ही शब्द दाटून आले. त्यांना ओळीत व्यक्त करण्याचा हा प्रयत्न...


धैर्य



झळा लागल्या अश्या शीतल सावल्यांच्या 

भेटलो गळा जेव्हा एकेक स्वकीयांच्या 

नाही कधी कळपात शिरलो कुणाच्या

राहिलो सदा मग जवळ कुंपणाच्या 

तुडवीत गेले जे सारासार विचारांना

संवेदना विहीन केले त्यांनीच साऱ्यांना

मीच माझे न लिहिले सन्मानपत्र

त्यांनीच अखेरी केला सन्मान सर्वत्र

जगताना इतके विषारी डंख झाले

सोनचंपाचे झाड मीच दारी लावले

कानोसा घेत सर्व दिलासा देत गेले

कृतीशून्य रिते शब्द ते ओकून गेले

जीवन संगरी हुतात्मा होऊ घातलो 

आप्त नव्हे मृत्यूची वाट पाहू लागलो

कोणी मला कधी जवळ केलेच कोठे? 

सोईने कार्य साऱ्यांनी उरकले होते

विपरितात साऱ्या सजवित होतो जीवन सारे

समिरानेच घात केला उधळले चित्र सारे

कळवू नका कुणाला वृत्त हे पराभवाचे

धैर्य अजुनी बाकी तुफान चक्र रोखण्याचे


नितीन सप्रे

nitinnsapre@gmail.com 

060820240935

नवी दिल्ली

टिप्पण्या

  1. कृतिशून्यफुकाचे शब्दसर्व ओकून गेले,
    किती समर्पक ओळ लिहीलीत तुम्ही।
    प्रसिद्ध लेखक व. पु. काळे एका कथेत लिहितात
    " ज्या मित्राचं पाकीट मारलं गेलय त्याला कसं मारलं ,कुठे मारलं, तुझं लक्ष कुठे होतं असले प्रश्न विचारू नयेत।सरळ त्याला शक्य तेव्हढी मदत करावी"
    छान आहे तुमची कविता।

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

प्रासंगिक- वसंतवैभव-कैवल्य गान

स्मृतीबनातून–सुधीर स्वरलालित्य

स्मृतीबनातून - देखण्या ‘बाकी’ काव्यपंक्ती