स्मृतीबनातून - प्रार्थना(पद्य)

गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांचं गीतांजली मधील एक अप्रतिम काव्य आणि त्याचा मराठी भावानुवाद...

मूळ बंगाली काव्य( मला समजावं यासाठी ते रोमन लिपीत पाठवून माझी सहकारी श्रेया मुखर्जी हिने मोठा सहयोग दिला)आणि इंग्रजी अर्थ

Bipade more rokkha karo e nohe mor praarthana –
Bipade aami naa jeno kori bhoy.
It is not my prayer that you save me from all perils
I pray that I should not fear when faced with odds

Dukhyotaape byathito chite naai baa dile santanaa,
Dukhyey jeno karite paari joy.
Console me not when I am torn with misery
Grant me instead the will to win against grief

Sahaay mor naa jodi jute nijer bol naa jeno tute –
Songsaarete ghotile khoti, labhile shudhu bonchona,
Nijer mone naa jeno maani khoy.
If no help comes forth, let my strength not crumble
When losses abound and I am deprived of everything
Let my heart not take this as defeat

Aamaare tumi koribe traan e nahe mor praarthana –

Tarite paari shakati jeno roy.
Protect me from the storms is not my prayer
Bless me the strength to sail through

Aamaar bhaar laaghab kori naai baa dile santana,
Bahite paari emni jeno hoy.
Need you not comfort me by lightening my burden
Bless me instead with the fortitude to bear

Namrashire sukher dine tomaari mukh loibo chine –
Dukher raate nikhil dharaa je din kore bonchona
Tomaare jeno na kori songshoy.
I know your presence when I bow to you in my days of prosperity
In my darkest nights when the whole world turns against me
Let me not ever doubt You.


'बिपदे मोरे राक्खा करो' गीतांजली मधील गुरुदेव टागोरांच्या या सुंदर काव्यात देवाकडे काय आणि कसं मागावं याची उत्तम अभिव्यक्ती झाली आहे. 'स्त्रीर मर्यादा' या बंगाली चित्रपटात हे गीत रुपात आहे. मूळ बंगाली कवितेचा अर्थ मराठी, इंग्रजीतून समजून घेतल्या नंतर मला स्फुरलेला हा भावानुवाद...


प्रार्थना

रक्षावे विपदेत मजसी अशी प्रार्थना नाही

अभयत्व असावे उरी विपदेत ही 

इतुकीच आहे मम इच्छा


कष्टी मनास तू फुंकर घाली 

अपेक्षिणार मी कधी नाही

अजयत्व मिळावे दु:खा वरही

इतुकीच आहे मम इच्छा


मदत न व्हावी कुणा कडूनही 

तक्रार माझी मुळी नाही

न द्यावे मजसी दुबळेपणही

इतुकीच आहे मम इच्छा


फसविता कुणी सावरावे ही

अपेक्षा कधी मनी नाही 

दृढता मनीची कायम राही

इतुकीच आहे मम इच्छा


मदतीस न धावला कुणी जरी 

न डगमगावी आंतरिक शक्ती

नुकसान साही वंचीत होऊनी

नसावे पराभवाचे शल्य हृदयी

इतुकीच आहे मम इच्छा


बुडती नौका द्यावी तारूनी 

प्रार्थना माझी नाही अशी

गाठण्या किनारा द्यावी शक्ती 

इतुकीच आहे मम इच्छा 


न करी सांत्वन माझा भार वाहुनी 

तक्रार न करी शब्दानी 

भार वाहण्या तू दे मज शक्ती 

इतुकीच आहे मम इच्छा


सुखात ही सदा तुला स्मरूनी

नतमस्तक मी होईन तव चरणी

दुःखसागरी मज जग देता लोटूनी 

शंका तुजप्रती न यावी मनी

इतुकीच आहे मम इच्छा





ऐकण्यासाठी - बिपदे मोरे राक्खा करो


नितीन सप्रे

nitinnsapre@gmail.com 

090820241745


टिप्पण्या

  1. अप्रतिम मराठी भावानुवाद. मुळात काव्य उत्तम आहे आणि तितकेच उत्तम भाषांतर झाले आहे.

    उत्तर द्याहटवा
  2. आपल्याला भावानुवाद स्फुरावा ही त्या प्रभूचीच ईच्छा! 🌷इतकी सुंदर प्रार्थना!!गुरुदेवांना वंदन.🙏🙏

    उत्तर द्याहटवा
  3. गुरुदेव टागोर यांची सुंदर कविता तिचा सुंदर अनुवाद आणि महत्त्वाचे म्हणजे ते काव्य आम्हाला ऐकता यावे म्हणून तुम्ही दिलेली व्हिडिओ लिंक त्यामुळे आजचा दिवस सत्कारणी लागला खूप आभार किरण ठाकूर यांच्याकडून

    उत्तर द्याहटवा
  4. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांची अप्रतिम रचना. तसेच त्याचा अत्यंत सहज-सुंदर इंग्रजी अनुवाद आणि त्यावर कडी म्हणजे तुझा अत्यंत तलम आणि मनाला व हृदयाला भिडणारा काव्यार्थ आणि भावार्थ. खूपच छान उतरलं य मनातुन, लेखणी द्वारे. असाच सुंदर व्यक्त होत रहा. तुझ्या पुढील सर्व लिखाणासाठी अत्यंत हार्दिक आणि मनःपूर्वक शुभेच्छा....

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. तुझा नेमक्या शब्दाताला रसग्रहणात्मक अभिप्राय आणि शुभेच्छा पुढील लेखनासाठी निश्चितच हुरूप वाढवणारा आहे. मनःपूर्वक धन्यवाद

      हटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

प्रासंगिक- वसंतवैभव-कैवल्य गान

स्मृतीबनातून - देखण्या ‘बाकी’ काव्यपंक्ती

स्मृतीबनातून निरंजनी स्वर-माणिक