स्मृतीबनातून - गीतसंग(पद्य)



गीतसंग


रवींद्र संगीत, बाऊल हे संगीत प्रकार जेव्हा केव्हा कानी पहिल्यांदा पडले तेव्हा पासूनच मनाला मोहिनी घालत आलेले आहे. अलीकडे गुरुदेव टागोर यांच्या काही कवितांचा भावानुवाद करत असताना

'Danriye achho tumi aamar gaaner oparey' 


माझ्या गीतातून मी तुला पाहतो) या गीतांनी मन वेधून घेतलं. ते इंग्रजी, रोमन बंगाली, हिंदीतून समजून घेण्याचा प्रयत्न केला आणि माझ्या कुवतीनुसार मराठीत त्याचा भावानुवाद केला. सर्वांना रसास्वाद घेता येईल या कल्पनेतून  मूळ बंगाली गीत, हिंदी गीत(यूट्यूब लिंक), मराठी भावानुवाद या ब्लॉग द्वारे आपल्या समोर मांडला आहे. साधक बाधक अभिप्राय स्वागतार्ह आहेत.


​या रचनेत कवी सांगत आहेत की, त्यांची कला (गाणी) ईश्वरा पर्यंत पोहोचते, पण कवी स्वतः संसाराच्या या तीरावर अडकलेले आहेत. ते ईश्वराला विनवणी करत आहेत की, आता अंतर न ठेवता तू माझ्या हृदयात ये. जो खेळ आतापर्यंत लांबून चालला होता, तो आता प्रत्यक्ष भेटीत आणि एकांतात पूर्ण होऊ दे.

'Danriye achho tumi aamar gaaner oparey.

Amar shurguli paay choron, ami pai ne tomare.

Batash bohey mori mori, aar bendhe rekho na tori.

Esho esho paar hoye mor hridoy majhare.

Tomar saathey gaaner khela duurer khela je,

Bedonate baanshi bajay shokol bela je.

Kobey niye aamar baanshi bajabe go apni ashi;

Anondomoy nirob raater nibir aandharey'



तू आहेस तिथे संपते माझे जीवनगाणे जिथे

ठेवी स्वर माझे तव चरणी पण का भेट नाही

वाहते मंद झुळूक घेऊन नाव ये ऐलतीरी 


करून काठ पार तो मम हृदयी  निवास कर

गीताचा हा सुरेल मेळ चालतसे दुरुनी फार 

विरह व्याकुळ ती बासरी घेत नाम दिनरात  

ये तू झडकरी, स्वकरी घेऊन बासरी वाजवी

या एकांत शांत आनंदी घनदाट रात्र काजळी



'Thou Art there on the far off banks of my songs—

My strains awash Your feet,      yet You’re beyond my reach.

             Sweet breeze blows,          tie Your boat no more—

                          Do cross over and come into my core.

                          From faraway I play with You through my songs,

                          This flute plays on my forlorn notes all day long.

            Picking up my flute to play'  


 

2.

स्वर माझे ऐकण्यास आतुर तू पैल तीरी

गीत तुझे गावयास झुरतो मी ऐल तीरी

हृदयी मम कर निवास धाव घे सत्वरी


स्वर येईना गळी नसशी समीप जोवरी

मनी सर्व काळ असे वेदना हीच दाटली 

युगुल गीत गाऊया सुरात सूर मिसळुनी


माझ्या सवे गावयास गीत जेव्हा येशील तू

युगुल स्वरां मधून फुलतील मग ऋतू

सकल निसर्गात जाईल बघ मोद उतू


पावरीने सतत हा एकाकी सूर छेडला

परतुनी येशील कधी प्राण स्वर व्हायला 

घन तीमिरी एकांती प्रसन्न स्वर गायला


Darniye acho -Bangla




नितीन सप्रे
nitinnsapre@gmail.com 




टिप्पण्या

  1. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांची ही रचना आपण मराठीत आणून समस्त रसिक जनांना आनंद दिलेला आहे।
    किती सुरेख. असं आत पाहता आलं पाहिजे।

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

प्रासंगिक- वसंतवैभव-कैवल्य गान

स्मृतीबनातून–सुधीर स्वरलालित्य

स्मृतीबनातून - देखण्या ‘बाकी’ काव्यपंक्ती