पोस्ट्स

सप्टेंबर, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

स्मृतीबनातून - मानवी जन्म(पद्य 4)

इमेज
आज आंतरराष्ट्रीय भाषांतर दिवस साजरा केला जातो. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या नोबेल पुरस्कार प्राप्त गीतांजलीतील काव्याचा सध्या मी  मराठीत भावानुवाद करत आहे. अनेक मित्र, मैत्रिणी, गुरुजन आणि जाणकारांनी मला भरघोस प्रतिसाद दिला. त्यामुळे माझा आत्मविश्वास दुणावला. आजच्या आंटरराश गीतांजलीतील हे चौथं पुष्प. आपला अभिप्राय अवश्य नोंदवा. Life of my life, I shall ever try to keep my body pure, knowing that thy living touch is upon all my limbs. I shall ever try to keep all untruths out from my thoughts, knowing that thou art that truth which has kindled the light of reason in my mind. I shall ever try to drive all evils away from my heart and keep my love in flower, knowing that thou hast thy seat in the inmost shrine of my heart. And it shall be my endeavour to reveal thee in my actions, knowing it is thy power gives me strength to act.(Geetanjali song 4) मानवी जन्म  हे जीवन दात्या प्रयत्ने राखिन पवित्र मम शरीरा जाणतो संजीवन स्पर्श तुझा लाभेल मम सर्व गात्रा करीन सदैव यत्न ठेविन दूर ...

स्मृतीबनातून - अनुग्रह(गीतांजली पद्य 6)

इमेज
गुरुदेव टागोरांच्या गीतांजलीतील हे सहावे पुष्प. कवीने स्वतःला पुष्प प्रतीमे द्वारे व्यक्त केले आहे. म्लान होण्या आधी, माझ्यात काही कमतरता असल्या तरीही मला तू अनुग्रहित करावे असे परमेश्र्वराकडे आर्जव करतात. "Pluck this little flower and take it, delay not! I fear lest it droop and drop into the dust I may not find a place in thy garland, but honour it with a touch of pain from thy hand and pluck it. I fear lest the day end before I am aware, and the time of offering go by. Though its colour be not deep and its smell be faint, use this flower in thy service and pluck it while there is time."(Geetanjali song 6) अनुग्रह मी एक सान फुल, वेचून घे त्वरे पूजेला फुलून जाता गळून मग,   मिळण्या आधी ते धुळीला तुझ्या गळ्यातील पुष्प मालेत, जरी स्थान नसे मला स्नेह करांनी टिपून अलगद, तू  घेशील ना आश्रयाला? भीती असे न होवो, अनुग्रहा आधीच दिन ढळला नसेल भक्तिरंग सु'वास' जरी तो, सखोल अंतरी रुजला नितीन सप्रे nitinnsapre@gmail.com  090920242130 ठाणे

स्मृतीबनातून - विश्र्वोत्सव(पद्य 16)

इमेज
गीतांजलीतील हे 16 वे पुष्प. मूळ बंगाली पण गुरुदेव रविंद्रनाथांनीच केलेल्या इंग्रजी भाषांतरा वरून केलेला हा मराठी भावानुवाद...  आपले साधक बाधक अभिप्राय महत्त्वाचे आहेत.  ब्लॉग आवडल्यास अन्य मंडळींना तो अग्रेशीत करू शकता. " I have had my invitation to this world's festival, and thus my life has been blessed. My eyes have seen and my ears have heard. It was my part at this feast to play upon my instrument, and I have done all I could. Now, I ask, has the time come at last when I may go in and see thy face and offer thee my silent salutation?"(Geetanjali song 16) विश्र्वोत्सव धन्य मी मिळाले मला निमंत्रण विश्र्वोत्सवाचे नेत्रे देखिले तृप्त  श्रुती  सर्व सुखे  छेडण्याची  सूरात  कर्मवाद्ये भूमिका मला  असे निभावली वाटे माझ्या परी ती आनंदे झाली का वेळ भैरवीची त्यासी विचारले घेऊनी मी दर्शन तयाला मौनात प्रार्थीले  नितीन सप्रे nitinnsapre@gmail.com  140920241424 ठाणे

स्मृतीबनातून - निष्फळ (गीतांजली पद्य15)

इमेज
या विशाल विश्वात मनुष्याचे अस्तित्व हे नगण्य आहे. ईश्र्वराशी अनुसंधान साधणे हेच त्याचे मुख्य कर्म आहे. अन्यथा त्याचे जीवन व्यर्थ आहे. तेव्हा तूझ्या प्रथानेची संधी देवून तुझ्या दर्शनाचा लाभ होवो अशी मनीषा रवींद्रनाथ टागोर या कवितेतून मांडतात. "I am here to sing thee songs. In this hall of thine I have a corner seat. In thy world I have no work to do; my useless life can only break out in tunes without a purpose. When the hour strikes for thy silent worship at the dark temple of midnight, command me, my master, to stand before thee to sing. When in the morning air the golden harp is tuned, honour me, commanding my presence."(Geetanjali 15) निष्फळ विश्वात   अणू मी जरासा आलो तुझे गीत गायला निष्क्रिय इथे मी निष्फळ जीवनी  वृथा छेडीतो तराणा येता समय त्या काळरात्री मंदिरात तव मौन प्रार्थनेचा हाक दे सख्या हरी येईन सत्वरी भजन करायाला मुरलीचे सोनेरी स्वर येतील पहाट वाऱ्या संगे तेव्हा   दर्शन देऊनी धर कृपा-छत्र तू मजवर देवा नितीन सप्रे nitinnsapre@gmail.com  120920242356 ठा...

स्मृतीबनातून - गीत उमजेना (गीतांजली पद्य3)

इमेज
गुरुदेव टागोर यांच्या गीतांजली या संग्रहातील हे तिसरं गीत. त्यांनी निरनिराळ्या काव्यातून प्रभू प्रती श्रद्धा व्यक्त केली आहे. या गीतात त्यांनी प्रभूला मास्टर म्युझिशियन संबोधलं आहे. त्याच्याच संगीताची अवघं विश्व भरल्या गेलं आहे. ते म्हणतात यात मलाही संम्मिलित व्हायचं आहे पण ती क्षमता माझ्यात नाही... "I know not how thou singest, my master! I ever listen in silent amazement. The light of thy music illumines the world. The life breath of thy music runs from sky to sky. The holy stream of thy music breaks through all stony obstacles and rushes on. My heart longs to join in thy song, but vainly struggles for a voice. I would speak, but speech breaks not into song, and I cry out baffled. Ah, thou hast made my heart captive in the endless meshes of thy music, my master!"(Geetanjali song 3) गीत उमजेना गुरूवरा कसे उमजावे मला तुझे संगीत अवाक होऊनी परी ऐकतो गीत  शांतीत स्वरे तुझ्या होते हे अवघे  विश्र्व  आलोकित  तुझे  जीवदायी  संगीत घुमे साऱ्या गगन मंडलात  दऱ्या...

स्मृतीबनातून - निवारा (गीतांजली पद्य 7)

इमेज
"My song has put off her adornments. She has no pride of dress and decoration. Ornaments would mar our union; they would come between thee and me; their jingling would drown thy whispers. My poet's vanity dies in shame before thy sight. O master poet, I have sat down at thy feet. Only let me make my life simple and straight, like a flute of reed for thee to fill with music."(Geetanjali song 7) निवारा इथे रवींद्रनाथ यांनी कविते साठी स्त्री हे रुपक वापरलं आहे आणि या कवितेने साहित्यिक/अलंकारिक शब्दांचा शृंगार आता उतरविला आहे कारण तो माझ्या आणि परमेश्वराच्या एकरूप होण्यातील अडथळा ठरत होता. ते म्हणतात साध्या सरळ आशयपूर्ण कविता माझ्याकडून करून घे  आणि तुझ्या चरणी निवारा दे ... उतरविला पुरंध्री ने तिचा शृंगार सारा नाही रूप सज्जेचा तिला अभिमान आता तुझ्या माझ्या मिलनातील अडथळा हा सारला दूर, ऐकण्या आशिष शब्द तुझा बघता तुला उतरला कवीचा गर्व सारा हे महाकवे, दे तुझ्या चरणाशी निवारा आयुष्य सरितेस लाभू दे सुंदर किनारा करी वेणू सम सुरेल माझ्या जीवनगीता नितीन सप्रे nitinnsapre@gmail.com 1...

स्मृतीबनातून - समर्पण(गीतांजली पद्य5)

इमेज
गीतांजली या इंग्रजी काव्य संग्रहा साठी साहित्याचा नोबेल पुरस्कार मिळवणारे गुरुदेव टागोर हे युरोपियन नसलेले पहिले पुरस्कार विजेते. गीतांजलीतील काव्य म्हणजे गुरुदेव टागोर यांनी सृष्टी निर्माता/परमेश्वर याच्या प्रती व्यक्त केलेलं भावदर्शन...मूळ इंग्रजी काव्या वरून केलेला हा भावानुवाद...आवडल्यास/नावडल्यास अभिप्राय नोंदवा. आवडल्यास अग्रेशित करू शकता. " I ask for a moment's indulgence to sit by thy side. The works that I have in hand I will finish afterwards. Away from the sight of thy face my heart knows no rest nor respite, and my work becomes an endless toil in a shoreless sea of toil" Today the summer has come at my window with its sighs and murmurs; and the bees are plying their minstrelsy at the court of the flowering grove. Now it is time to sit quite, face to face with thee, and to sing dedication of life in this silent and overflowing leisure. "(Geetanjali song 5) समर्पण दे तव निकट वास ठेवतो मम दूर व्याप तुज विण अंत-हीन  भासे मज  संसार ताप क्षण आला तो भाग्याचा व्ह...

स्मृतीबनातून-भेट स्वस्वरुपाची(गीतांजली पद्य 13)

इमेज
गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या गीतांजलीतील हे 13 वं पुष्प. परमेश्वर प्राप्ती हे मनुष्य जन्माचं अंतीम उद्दिष्ट प्राप्त करून घेतानाची भावावस्था त्यांनी या गीतात मांडली आहे. "The song that I came to sing remains unsung to this day. I have spent my days in stringing and in unstringing my instrument. The time has not come true, the words have not been rightly set; only there is the agony of wishing in my heart. The blossom has not opened; only the wind is sighing by. I have not seen his face, nor have I listened to his voice; only I have heard his gentle footsteps from the road before my house. The livelong day has passed in spreading his seat on the floor; but the lamp has not been lit and I cannot ask him into my house. I live in the hope of meeting with him; but this meeting is not yet (Geetanjali song no 13) भेट स्वस्वरुपाची गीत जे मी आलो गावयाला ते अजुन गवसले नाही सरून सारा काळ गेला मन साज सूरात लागले नाही   न आली सुयोग्य वेळ न रचले ते शब्द घनआशय  इच्छा मनी ती होती प्रब...

स्मृतीबनातून - ध्यास मिलनाचा(गीतांजली पद्य 38)

इमेज
गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या गीतांजलितील हे 38 वे पुष्प. लौकिक आयुष्यातील आसक्ती, वासना सतत अडथळे निर्माण करीत असल्या तरी तुझ्याच मिलनाचा ध्यास कुठेतरी खोल अंतरात वसतो याची हमी ते त्या सर्वेशाला देत आहेत. मूळ बंगाली परंतु गुरुदेव टागोरांनी इंग्रजीत केलेलं भाषांतर वाचून घडलेला हा भावानुवाद. 'That I want thee, only thee - let my heart repeat without end. All desires that distract me, day and night, are false and empty to the core. As the night keeps hidden in its gloom the petition for light, even thus in the depth of my unconsciousness rings the cry - 'I want thee, only thee'. As the storm still seeks its end in peace when it strikes against peace with all its might, even thus my rebellion strikes against thy love and still its cry is - 'I want thee, only thee'(Geetanjali 38) ध्यास मिलनाचा संगे तुझ्या व्हावे मिलन ध्यास हृदयी हाच अविरत मनी वासना रित्या आभासी परी छळती मला दिनरात निशा जशी लपवी प्रकाश आस, स्व घन तिमिरात दडली तशीच ओढ तव दर्शनाची सखोल अचेत मनात तुझ्याच...