पोस्ट्स

फेब्रुवारी, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
इमेज
98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी दिल्लीत असताना इंडिया गेट परिसरातील पहाट फेरीत भेटलेल्या तिला पाहून... चंद्रिका आकाश भाळी कोर उमटली छान सान गोड लाघवी जरा रुपेरी जरा केशरी तरु छायेतून अशी डोकवणारी असेल का नवजात बालिका की असेल कुणी षोडशा  पुरंधरी की नव यौवना ? नितीन सप्रे nitinnsapre@gmail.com  210220250711 नवी दिल्ली

स्मृतीबनातून शिवास्तुती(पद्य)

इमेज
शिवास्तुती कडकडला सह्याद्री, दशदिशा अश्या गडगडल्या दख्खन प्रांती, नृसिंह शिवा अवतरला  ll ध्रु ll  रक्षीयला आर्य, निःपात शत्रूचा केला अभिमाने देशी, भगवा ध्वज फडकवला  ll १ ll  नाश दुष्कृतीचा करुनी, परपाश झुगारुन दिधला  स्थापून स्वराज्य शिवबा, छत्रपती झाला ll २ ll  ही तो श्रींची इच्छा, वदुनी  केला, कारभार नेटका न्यायानी  सर्वत्र जाणला गेला जाणता राजा म्हणुनी  ll ३ ll  नितीन सप्रे 9869375422/8851540881 nitinnsapre@gmail.com  120220252055 माघ पौर्णिमा

स्मृतीबनातून-आर्जव(पद्य)

इमेज
काल राजा मेहदी अली यांचं मदन मोहन यांनी संगीतबद्ध केलेलं आणि इंटरनेट वर 30 कोटी हुन अधिक श्रोत्यांचं प्रेम लाभलेल्या लग जा गले के  फिर यही  या साहिर यांच्या गीताचे #अजय साहेब यांनी लिहिलेले आणि #राजेश सिंग यांनी प्रस्तुत केलेले अप्रतिम नवे अंतरे ऐकत असताना माझ्या मनात उठलेले तरंग...आपल्यासाठी... आर्जव   देण्यास तुजला आता, नाही सुमनांची ओंजळ सु'मनात'साठविले तुला, भाव आहे प्रांजळ स्वीकार मोठ्या मनाने, करितो अंतिम आर्जव कुणा शक्य आहे; रोखणे वेग काळ थबकून आज पळभरी, बोलून प्रेम बोल ठावे कुणा, पुन्हा होईल का भेट आयुष्य विझू लागले, चल चेतवू क्षणकाल  पदही थरथरू लागले, घेऊ ओलांडून रानमाळ कोण जाणे पुढती, हाती असेल का हात  भाग्ये लाभली आम्हा, ही सोन सायंकाळ निर्विकल्प साधून जाई, दिसता अंबरी बकमाळ    भाळी नसेल पुढती, ऐसा सुवर्ण काळ गळा भेट घेई, पुन्हा घडणार नाही मिठी घालोनी परस्परांना, डोळ्यातून नीर वाही भूतलावरी पुन्हा, या नजरा भिडणार नाही नितीन सप्रे nitinnsapre@gmail.com  090220252315 रविवार, ठाणे