स्मृतीबनातुन तक्रार (पद्य)
तक्रार
मान वेळावुनी, तू अशी पाहू नको
पाहता तरी, अशी गोड हासू नको
का उगा खेळशी कुंतल लटांशी
वाटे हेवा अंगुलीचा त्या विभ्रमानी
काय मी तुझी, काढली सांग छेड?
नृत्य तव पापण्यांचे लावते वेड
चालही तुझी ही अशी जीवघेणी
पाहता हृदय झाले पाणीपाणी
शब्द तुझे की श्रोत्यास मधुपान
वाटते की ते घ्यावे सारे चुंबुन
सृजन ऐसे केले तुला उर्वशी
मानू कसे मग तया समन्यायी
नितीन सप्रे
nitinnsapre@gmail.com
130320251820
हुताशनी पौर्णिमा

छान कविता!
उत्तर द्याहटवाछान कविता आणि चित्रही आवडले मला.
उत्तर द्याहटवाखूपच उत्कट आणि तरल. तसेच चित्र आणि शब्दसंगती एकमेकांना पूरक...
उत्तर द्याहटवा