स्मृतीबनातून – निःशब्द (पद्य ४७/100)
I dive down into the depth of the ocean of forms, hoping to gain the perfect pearl of the formless.
No more sailing from harbour to harbour with this my weather-beaten boat. The days are long passed when my sport was to be tossed on waves.
And now I am eager to die into the deatess.
Into the audience hall by the fathomless abyss where swells up the music of toneless strings I shall take this harp of my life.
I shall tune it to the notes of forever, and when it has sobbed out its last utterance, lay down my silent harp at the feet of the silent.
निःशब्द
रुपसागरी खोल सूर मारुनी
रत्न अपरूप मिळावे म्हणुनी
जीर्ण जर्जर अशा नौकेतून या
प्रवास नको मज घाटा घाटाचा
स्वार लहरींवर व्हावे कशाला
अमर व्हावे मरुनी सागरतळा
काना वाटे जे न ऐकण्याचे गाणे
गायले जात असे जे नित्य जेथे
जाईन घेऊन प्राणवीणा तेथे
एकदाच स्वरात जुळावी जिथे
क्रंदन अंतिम त्यावर छेडून
नीरव त्याच्या चरणाशी अर्पून
स्वये जाईन मी निःशब्द होऊन
४७/100
नितीन सप्रे
nitinnsapre@gmail.com
240320251625
ठाणे
This beautiful excerpt is from Rabindranath Tagore’s Gitanjali (Song Offerings). The original Bengali poem is Song 128 (in the Bengali edition) or Song 100 (in the English translation).
It reflects the soul's yearning to move beyond the physical world (the "ocean of forms") into the eternal, formless ultimate reality.
Original Bengali (in Devanagari Script)
रूपसागरे डूब दिएछी अरूप-रतन आशा करि।
आमि आर फिरबो ना गो कुले कुले खेया बाये एई तरी॥
आमार ये दिन गेछे ये दिन गेछे खेलार छले,
एखन् आमि हेलादोलाय मातब ना आर ढेउयेर कोले।
एखन् आमि मरन-माझे मरबो एइ तो आशा धरि—
आमि आर फिरबो ना गो कुले कुले खेया बाये एई तरी॥
येथाय गभीर अतल-तले बाजे तानहारा सुर,
सेथाय नीरव मनेर माझे नेब आमि प्राण-पुर।
चिरदिनेर कान्ना-हासि सुरे गेंथे प्राण-वीणा,
शेष कोरे तार शेष बाजानो देवो चरने सँपि ताँरि॥
Marathi Meaning (मराठी भावार्थ)
टागोरांच्या या रचनेत जीवात्म्याची परमात्म्याशी मिलन होण्याची ओढ दिसून येते. याचा मराठी अनुवाद खालीलप्रमाणे आहे:
१. आकारांच्या या महासागरात मी डुबकी घेत आहे, त्या 'निराकार' (formless) रत्नाच्या आशेने.
मी आता माझ्या या जुन्या आणि थकलेल्या नावेने एका किनाऱ्यावरून दुसऱ्या किनाऱ्याकडे भटकणार नाही. लाटांवर स्वार होऊन खेळण्याचे माझे दिवस आता संपले आहेत.
२. आता माझी इच्छा त्या 'अमरत्वा'मध्ये स्वतःला झोकून देण्याची (मरण पावण्याची) आहे.
जिथे त्या अथांग खोल गर्तेत (Abyss) निनादहीन तारांचे संगीत ऐकू येते, तिथे मी माझ्या जीवनाची ही वीणा घेऊन जाईन.
३. मी माझ्या आयुष्याची ही वीणा 'अनंतकाळाच्या' सुरांमध्ये ट्यून (तालमीबद्ध) करेन.
आणि जेव्हा या वीणेचा शेवटचा सूर उमटून शांत होईल, तेव्हा ही 'मूक वीणा' मी त्या परमेश्वराच्या (शांततेच्या) चरणी अर्पण करेन.
Key Highlights
- The Metaphor: The "weather-beaten boat" represents the aging human body or the ego that has spent a lifetime navigating worldly pleasures.
- The Transition: Tagore moves from the "ocean of forms" (the physical world) to the "silent" (the spiritual realm).
- The Climax: Offering the "harp of life" at the feet of the Divine signifies the ultimate surrender at the end of life's journey

नीरव त्यांच्या चरणी अर्पून...यथाय़ोग्य,अगदी भावस्पर्शी शब्द रचना! फार सुंदर भावानुवाद.अभिनंदन!💐🙏🏽
उत्तर द्याहटवा