स्मृतीबनातून –प्रकृती (पद्य ४८)


प्रकृती






आकाशतळी आलोकीत कमल शतदल

पाकळ्यांचा फुलोरा सजला सर्वत्र

झाकले निबीड काजळ कृष्णजळ 

बैसलो ब्रह्मासम सुवर्ण कोषात 

भोवताली अंबुज पसरवी आलोक


आकाशात जणू उठल्या लाटा

गगनात समीर वाहू लागला

चहूदिशा छेडती गीत आलाप

थिरकले प्राण नृत्य सर्वत्र

कवटाळी मम स्पर्शरूप आकाश 

जाहला समीर प्रेमला नभस्पर्श

डुंबतो या प्राणसागरी सार्थ


दहा दिशांचा पल्लव पसरून

धरा मजला अंकी बसवून

घेते सकला ती बोलावून

अन्न समष्टी देते वाटून


गंध गीताने मानस उजळून

क्षण काळाशी येथे थांबून

अवनीने अपुल्या पदरी घेऊन

घेतले मजसी अंकित करून


आलोका माझा प्रणिपात घेऊन

करून घे मम दोष विहीन

मस्तक माझे प्रेमे कराने स्पर्शून

लाभो पित्याचे मज आशीर्वचन


स्वीकार पवना माझे नमन

घ्यावी सकलांची ग्लानी हरून 

तनुसी माझ्या तू गोंजारून 

द्यावी त्याची अनुभूती करून


मृत्तिके तुझेही करितो अर्चन

घ्याव्या करून वासनाही हरण

सुफलीत करून द्यावे जीवन

लाभो परम पित्याचे दर्शन


नितीन सप्रे, ठाणे

nitinnsapre@gmail.com 

3103202516


आकाश तले उठल फुटे 
आलोर शतदल(song no 48)

क्लिक करा – आकाश तले उठल फुटे


टिप्पण्या

  1. अप्रतिम काव्यानुभूती! 'अन्नसमष्टी' सखोल आशयसंपन्न शब्द.. गदिमांच्या 'मृग' या कवितेची आठवण आली.

    उत्तर द्याहटवा
  2. सुंदर समर्पक कवितानुवाद! छान!

    उत्तर द्याहटवा
  3. प्रकृतीचा अत्यंत सुंदर काव्यानुभव. अवघा निसर्ग डोळ्यांसमोर उभा राहिला.

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

प्रासंगिक- वसंतवैभव-कैवल्य गान

स्मृतीबनातून - देखण्या ‘बाकी’ काव्यपंक्ती

स्मृतीबनातून निरंजनी स्वर-माणिक