स्मृतीबनातून –प्रकृती (पद्य ४८)


आकाश तले उठल फुटे (मराठी अनुवाद)

​आकाशाच्या अंगणात प्रकाशाच्या मंजिरी उमलल्या आहेत,

आणि इकडे तिकडे रंगांचा सुगंध दरवळला आहे.

​पृथ्वी आज आनंदाने शहारली आहे,

तिच्या हृदयाच्या मध्यभागी जणू बासरी वाजत आहे.

इथे सगळीकडे रंगांचा सुगंध दरवळला आहे.

​वाऱ्यावर कोवळ्या पानांचे थवे डोलत आहेत,

गवताच्या पात्यावर दवबिंदू झळकत आहेत.

​प्रकाशाने हे विश्व न्हाऊन निघाले आहे,

आता ही जीवन-नौका पैलतीराला जाण्यास सज्ज झाली आहे.

सगळीकडे रंगांचा सुगंध दरवळला आहे.

​थोडक्यात स्पष्टीकरण:

​टागोरांनी या कवितेत सकाळच्या निसर्गाचे अतिशय विलोभनीय वर्णन केले आहे. जेव्हा सूर्य उगवतो, तेव्हा केवळ प्रकाशच येत नाही, तर जणू काही रंगांचे सुगंधी फूल उमलते. निसर्गातील चैतन्य पाहून कवीला असे वाटते की ही पृथ्वी आनंदाने थरारत आहे आणि तिच्या कणाकणातून संगीताचे सूर उमटत आहेत.


प्रकृती







आकाश प्रांगणी कमल उमलत

फुलोरा पाकळ्यांचा सजला सर्वत्र

झाकले निबीड काजळ कृष्णजळ 

बैसलो ब्रह्मासम सुवर्ण कोषात 

भोवती अंबुज पसरवी आलोक


आकाशी जणू उसळल्या लाटा

गगनी समीर वाहू लागला

चहूदिशा छेडती गीत स्वर

थिरकले प्राण नृत्य सर्वत्र

कवटाळी स्पर्शरूप आकाश 

जाहला समीर प्रेमला नभस्पर्श

डुंबतो या प्राणसागरी सार्थ


दहा दिशा पल्लव पसरून

धरा मजला अंकी बसवून

घेते सकलांसी ती बोलावून

अन्न समष्टी देते ती वाटून


गंध गीत मानस उजळून

क्षण काळाशी इथेच थांबून

पृथ्वी अपुल्या पदरी घेऊन

मजसी घेते करून अंकित


आलोक माझा प्रणिपात घेऊन

करून घे मम दोष विहीन

मस्तक माझे प्रेमाने स्पर्शून

लाभो पित्याचे मज आशीर्वचन


स्वीकार पवना माझे नमन

घ्यावी सकलांची ग्लानी हरून 

तनुस माझिया तू गोंजारून 

द्यावी त्याची अनुभूती करून


मृत्तिके तुझे करितो अर्चन

घ्याव्या करून वासना हरण

सुफलीत करा माझे जीवन

लाभो परम पित्याचे दर्शन


नितीन सप्रे, ठाणे

nitinnsapre@gmail.com 

3103202516


आकाश तले उठल फुटे 
आलोर शतदल(song no 48)

क्लिक करा – आकाश तले उठल फुटे


टिप्पण्या

  1. अप्रतिम काव्यानुभूती! 'अन्नसमष्टी' सखोल आशयसंपन्न शब्द.. गदिमांच्या 'मृग' या कवितेची आठवण आली.

    उत्तर द्याहटवा
  2. प्रकृतीचा अत्यंत सुंदर काव्यानुभव. अवघा निसर्ग डोळ्यांसमोर उभा राहिला.

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

प्रासंगिक- वसंतवैभव-कैवल्य गान

स्मृतीबनातून–सुधीर स्वरलालित्य

स्मृतीबनातून - देखण्या ‘बाकी’ काव्यपंक्ती