स्मृतीबनातून – भरती(गीतांजली पद्य ९)

भरती



आनंदेरई सागर थेके (९)

आनंद सागरास आज अशी भरती आली

वल्हवा जीवन नौका तुम्ही दृढ राहुनी

घ्या लादून नौकेत ती दुःखे सारी

निर्धार पार जाण्याचा पातला मृत्यू जरी

आनंद सागरास आज अशी भरती आली


कोण रे तो मागुती फिरण्यास सांगतो

कोण रे तो अशी मनाई करतो

उत्सव काळी कोण भयाचे स्मरण करतो

भय तुमचे ते आम्ही सर्व जाणतो

कुठली ग्रहपीडा अन् कुठला शाप तो?

सुखे किनारी का बसून राहण्यास सांगतो?

धाडसाने धरा रे शिडाच्या दोऱ्या सर्व

गाऊ या मिळून सुरेल गीत पर्व

आनंद सागरास आज अशी भरती आली


नितीन सप्रे

nitinnsapre@gmail.com 

010420251645

क्लिक करा –आनंदेरई सागर थेके







टिप्पण्या

  1. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या या कवितेचा तुम्ही केलेला अनुवाद अतिशय प्रेरणादायी असाच आहे .गुरुदेवांचे शब्द तुम्ही अतिशय योग्य रीतीने भाषांतरित करून ती कविता मराठी वाचकांना सोपी करून दिली धन्यवाद

    उत्तर द्याहटवा
  2. सुंदर, बंगाली साहित्य या निमित्ताने वाचायला मिळते

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

प्रासंगिक- वसंतवैभव-कैवल्य गान

स्मृतीबनातून - देखण्या ‘बाकी’ काव्यपंक्ती

स्मृतीबनातून निरंजनी स्वर-माणिक