स्मृतीबनातून – भरती(गीतांजली पद्य ९)
ही कविता सांगते की, ईश्वर हा केवळ मंदिरात नसून तो निसर्गाच्या कणाकणात आणि मानवाच्या आनंदाच्या लहरींमध्ये व्यापलेला आहे. जेव्हा माणूस सृष्टीच्या या अथांग सौंदर्याशी एकरूप होतो, तेव्हा त्याला खऱ्या आनंदाची आणि ईश्वराची प्राप्ती होते.
आनंदेरई सागर थेके एसेछे आज बान
दाओ गो सभाय छेड़े दाओ गो, भरे निओ गान।
आलोक-छायार महामेलाय, आमिओ जे एक कोना,
धूलि-कनार माझे आमार आपनके जे जाना।
एइ जे आकाश, एइ जे बातास, एइ जे आलोक-धारा
सकल सुखेर माझे आमि हयेछि आत्महारा।
जेइ दिके तेइ ताहार पावा, जाहार शेष नेइ कभु,
आपनार माझपाने ताहारेई खुँजे पावा प्रभु।
भरती
आनंदेरई सागर थेके (९)
आनंद सागरास आज भरती आली
वल्हवा जीवन नौका तुम्ही दृढ राहुनी
घ्या लादून नौकेत ती दुःखे सारी
निर्धार पार जाण्याचा पातला मृत्यू जरी
आनंद सागरास आज अशी भरती आली
कोण रे तो मागुती फिरण्यास सांगतो
कोण रे तो अशी मनाई करतो
उत्सव काळी कोण भयाचे स्मरण करतो
भय तुमचे ते आम्ही सर्व जाणतो
कुठली ग्रहपीडा अन् कुठला शाप तो?
सुखे किनारी का बसून राहण्यास सांगतो?
धाडसाने धरा रे शिडाच्या दोऱ्या सर्व
गाऊ या मिळून सुरेल गीत पर्व
आनंद सागरास आज अशी भरती आली
नितीन सप्रे
nitinnsapre@gmail.com
010420251645
क्लिक करा –आनंदेरई सागर थेके
आनंदेरई सागर थेके (मराठी अनुवाद)
मूळ ओळ: आनंदेरई सागर थेके एसेछे आज बान
अर्थ: आज आनंदाच्या सागराला जणू भरती आली आहे (आनंदाचा पूर आला आहे).
मूळ ओळ: दाओ गो सभाय छेड़े दाओ गो, भरे निओ गान।
अर्थ: या आनंदसभेत स्वतःला पूर्णपणे झोकून द्या आणि आपले जीवन गाण्याने (सुरांनी) भरून घ्या.
मूळ ओळ: आलोक-छायार महामेलाय, आमिओ जे एक कोना,
अर्थ: प्रकाश आणि सावलीच्या या विस्तीर्ण खेळात (सृष्टीच्या मेळाव्यात), मी सुद्धा एक छोटासा कोपरा (अंश) आहे.
मूळ ओळ: धूलि-कनार माझे आमार आपनके जे जाना।
अर्थ: या धुलिकणांमध्येच मला माझे स्वतःचे अस्तित्व गवसले आहे (स्वतःची ओळख पटली आहे).
मूळ ओळ: एइ जे आकाश, एइ जे बातास, एइ जे आलोक-धारा,
अर्थ: हे आकाश, हा वारा आणि ही प्रकाशाची अखंड धारा...
मूळ ओळ: सकल सुखेर माझे आमि हयेछि आत्महारा।
अर्थ: या सर्व सुखांच्या वर्षावात मी स्वतःला विसरलो आहे (मी आत्मविभोर झालो आहे).
मूळ ओळ: जेइ दिके तेइ ताहार पावा, जाहार शेष नेइ कभु,
अर्थ: मी ज्या दिशेला पाहतो, तिथे मला तोच (परमेश्वर) दिसतो, ज्याचा कधीही अंत नाही.
मूळ ओळ: आपनार माझपाने ताहारेई खुँजे पावा प्रभु।
अर्थ: आणि शेवटी माझ्या स्वतःच्या अंतरातही मला त्या प्रभूचेच दर्शन घडते.
थोडक्यात सारांश:
काही महत्त्वाचे शब्दार्थ:
- बान (बान): पूर किंवा भरती.
- आलोक (आलोक): प्रकाश.
- आत्महारा (आत्महारा): स्वतःचे भान हरपलेला (Be lost in joy).
आनंद सागरास आज भरती आली
दे झोकून, जीवन भरून घे सुरांनी
अंश मी आलोक सावली खेळा मधला
धुळी कणात गमले अस्तित्व मजला
इथले हे आकाश वारा प्रकाश धारा
भुलविती सारी सुखे माझिया मनाला
वळतो ज्या दिशेला पाहतो अनंताला
अंतरातही अंती भेटी भगवंताला


गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या या कवितेचा तुम्ही केलेला अनुवाद अतिशय प्रेरणादायी असाच आहे .गुरुदेवांचे शब्द तुम्ही अतिशय योग्य रीतीने भाषांतरित करून ती कविता मराठी वाचकांना सोपी करून दिली धन्यवाद
उत्तर द्याहटवासुंदर, बंगाली साहित्य या निमित्ताने वाचायला मिळते
उत्तर द्याहटवा