स्मृतीबनातून –वारी(पद्य)

वारी


पंढरीला जाईन

आनंदें नाचीन 

विठुरायाला भेटेन

चरण धरीन


घेऊन दर्शन

होऊनिया लीन 

देहबुद्धी म्लान 

चंद्रभागेत धुऊन


अहंभाव सांडून

कीर्तनी रंगीन 

घडव सुजाण 

प्रसाद मागीन 


देई आशीर्वचन 

कृपाळू भगवान

विठाई समचरण 

आनंद निधान 


नितीन सप्रे

 

060720250640

आषाढी एकादशी


टिप्पण्या

  1. पांडुरंगाच्या चरणी लीन व्हावे
    गुण गावे देवी रखुमाईचे
    तुमची कविता सुरेख।।
    पांडुरंग हरि विठ्ठल रखुमाई

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

प्रासंगिक- वसंतवैभव-कैवल्य गान

स्मृतीबनातून - देखण्या ‘बाकी’ काव्यपंक्ती

स्मृतीबनातून निरंजनी स्वर-माणिक