स्मृतीबनातून –वारी(पद्य)

वारी


पंढरी जाईन

आनंदें नाचून

विठुला भेटेन

चरण धरीन


घेऊन दर्शन

होऊनी लीन 

देहबुद्धी म्लान 

चंद्रभागी धुऊन


अहंता सांडून

कीर्तनी रंगीन 

घडव सुजाण 

प्रसाद घेईन 


दे आशीर्वचन 

कृपा भगवान

तू समचरण 

आनंद निधान 


नितीन सप्रे

 

060720250640

आषाढी एकादशी


टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

प्रासंगिक - उड्डाण परी- कॅप्टन जोया

स्मृतीबनातून - तरूतळीची विरहिणी

स्मृतीबनातून –झूठे नहीं जूठे नैन