स्मृतीबनातून–भाळणे(पद्य)



वाफाळलेल्या कडक फिल्टर कॉफीचे घोट घेत
खिडकी बाहेर सुरू असलेला सोनकिरणं आणि पाऊस सरींचा खो खो पाहत असताना अचानक ही कविता नजरे समोर आली...

आणि अंतरंगातून दशाक्षरी रूपात प्रकटली...

भाळणे 


शृंगारावर तुझ्या भाळलो 

रेशम भासांवरी भाळलो

नाहीस तू जवळ तरीही

आठवांवरी तुझ्या भाळलो


तूही मला स्मरले असशील

त्या क्षण काळावरी, भाळलो

आपुलीच आहे जिथे कहाणी 

निःशब्द ओठांवरी भाळलो


गंधाळले जे तुझ्या प्रीतीने

मृदु आभासांवरी भाळलो 

स्वप्न असावी भेट आपली

स्वप्नील स्वप्नावरी भाळलो


नितीन सप्रे

030820251645


टिप्पण्या

  1. मूळ हिंदी कविता जितकी चांगली तितकीच मराठी काव्य रचना अप्रतीम झालीय.
    त्यातले भाव यातही तितक्याच उत्कटतेने उतरले आहेत.
    मित्रवर्य खूपच छान.

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

प्रासंगिक- वसंतवैभव-कैवल्य गान

स्मृतीबनातून–सुधीर स्वरलालित्य

स्मृतीबनातून - देखण्या ‘बाकी’ काव्यपंक्ती