स्मृतीबनातून – नाते (पद्य)
नाते
उलटून मोठा काळ गेला, भेटला कोणी नाही कधी
ना पुसली ख्याली खुशाली वा कुठला आरोप नाही
मौनात मी राहिलो जरा, प्रवाही झालो काळा सवे
नात्यात वाटली ओल होती, कोरडी होत गेली स्वये
का काढीशी तू खपल्या पुन्हा जुनाट कोरड्या जखमांवरीच्या
परतून अचानक का उगाच, तू पुन्हा येऊ लागला
आता न पहिल्या प्रमाणे, हृदयी प्रीत भावना तशी
नव्याने आता चेहरा माझा सजणार तो नाही कधी
मनात नाही सल आता, मिटले घट्ट ते दरवाजे
थाप पडताच न धावते, आता नाते थकून गेले
जे नाही विचारता आले, एकांती निवांत भेटीत सारे
आता कसे पुसावे तुला, कुठल्या कारणाने गर्दीत यारे
नितीन सप्रे
050920251830
छान
उत्तर द्याहटवा