स्मृतीबनातून – रिक्तता(पद्य)
रिक्तता
काही न उरले जीवनी
तसे काहीच नसते जीवनी
आजन्म वाटले, सत्य येईल कामी
सत्याने सर्वकाही मिळते का जीवनी?
कितीक पाहिली होती स्वप्ने जीवनी
पूर्तते आधीच, जाग आली जीवनी
मारले कित्येकदा अपुल्या मनाला जीवनी
वाटले जसा, जगलोच नाही जीवनी
लोभ होता ज्यांच्यावरी या जीवनी
कृतघ्नतेचे उपासक ते निघाले जीवनी
गमावले एकेक सारे या जीवनी
कफल्लक झालो श्वासा गणिक या जीवनी
नितीन सप्रे
nitinnsapre@gmail.com
300620251820

"जिंदगी एक सफर है सुहाना यहा कल क्या हो किसने जाना मौत आनी है आयेगी एक दिन जान जानीहै जायेगी एक दिन मुस्कुराते हुए दिन बिताना यहा कल क्या हो किसने जाना "जे मिळाले आहे त्याच्यामध्ये आनंद मानायचा. सत्याची कास सोडायची नाही. कर्मावरचा विश्वास दृढ ठेवायचा. आपला हा शेवटचा जन्म आहे हे निश्चित मानायचं मग त्रास होणारच नाही. सात दिवस शेवटचे आपल्याला मिळाले आहेत हे जसं एकनाथ महाराजांनी सांगितलं होतं त्यावर विचार केला तर जीवन आनंददायी आहे.
उत्तर द्याहटवाप्रिय श्री नितीन निळकंठ सप्रे, खूप छान कविता, निराश मनांसाठी! पण तुम्ही एवढे लोकप्रिय ब्लॉगर असून एवढी निराशावादी कविता कशी लिहिली!? त्याची आता भरपाई करावी, व थोडा अध्यात्माचा आधार घेऊन आशादायी कविता सादर करावी ही माझी नम्र विनंती आहे, 😊🕉️🇮🇳🙏✅
हटवा