स्मृतीबनातून – रिक्तता(पद्य)

रिक्तता 


आता काही न उरले जीवनी

तसे काहीच नसते जीवनी

स्वप्ने अमाप पाहिली जीवनी

पूर्तते पूर्वी, जाग आली जीवनी

मारले मन प्रत्येकदा जीवनी

मुक्त जगलोच नाही जीवनी

लोभ होता ज्यांच्या वरी जीवनी

कृतघ्न ते सर्व निघाले जीवनी

गमावले सर्वस्व या जीवनी

रिक्तता श्वासागणिक जीवनी

आजन्म भासे, येते सत्य कामी

आभास हा नच ये सत्य कामी

व्हायचे मुक्त असता या रणी

राघव शेला घे तू पांघरूनी 



नितीन सप्रे

nitinnsapre@gmail.com 

300620251820



टिप्पण्या

  1. "जिंदगी एक सफर है सुहाना यहा कल क्या हो किसने जाना मौत आनी है आयेगी एक दिन जान जानीहै जायेगी एक दिन मुस्कुराते हुए दिन बिताना यहा कल क्या हो किसने जाना "जे मिळाले आहे त्याच्यामध्ये आनंद मानायचा. सत्याची कास सोडायची नाही. कर्मावरचा विश्वास दृढ ठेवायचा. आपला हा शेवटचा जन्म आहे हे निश्चित मानायचं मग त्रास होणारच नाही. सात दिवस शेवटचे आपल्याला मिळाले आहेत हे जसं एकनाथ महाराजांनी सांगितलं होतं त्यावर विचार केला तर जीवन आनंददायी आहे.

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. प्रिय श्री नितीन निळकंठ सप्रे, खूप छान कविता, निराश मनांसाठी! पण तुम्ही एवढे लोकप्रिय ब्लॉगर असून एवढी निराशावादी कविता कशी लिहिली!? त्याची आता भरपाई करावी, व थोडा अध्यात्माचा आधार घेऊन आशादायी कविता सादर करावी ही माझी नम्र विनंती आहे, 😊🕉️🇮🇳🙏✅

      हटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

प्रासंगिक- वसंतवैभव-कैवल्य गान

स्मृतीबनातून–सुधीर स्वरलालित्य

स्मृतीबनातून - देखण्या ‘बाकी’ काव्यपंक्ती