पोस्ट्स

स्मृतीबनातून - गीतसंग(पद्य)

इमेज
गीतसंग रवींद्र संगीत, बाऊल हे संगीत प्रकार जेव्हा केव्हा कानी पहिल्यांदा पडले तेव्हा पासूनच मनाला मोहिनी घालत आलेले आहे. अलीकडे गुरुदेव टागोर यांच्या काही कवितांचा भावानुवाद करत असताना 'Danriye achho tumi aamar gaaner oparey'  माझ्या गीतातून मी तुला पाहतो) या गीतांनी मन वेधून घेतलं. ते इंग्रजी, रोमन बंगाली, हिंदीतून समजून घेण्याचा प्रयत्न केला आणि माझ्या कुवतीनुसार मराठीत त्याचा भावानुवाद केला. सर्वांना रसास्वाद घेता येईल या कल्पनेतून  मूळ बंगाली गीत, हिंदी गीत(यूट्यूब लिंक), मराठी भावानुवाद या ब्लॉग द्वारे आपल्या समोर मांडला आहे. साधक बाधक अभिप्राय स्वागतार्ह आहेत. ​या रचनेत कवी सांगत आहेत की, त्यांची कला (गाणी) ईश्वरा पर्यंत पोहोचते, पण कवी स्वतः संसाराच्या या तीरावर अडकलेले आहेत. ते ईश्वराला विनवणी करत आहेत की, आता अंतर न ठेवता तू माझ्या हृदयात ये. जो खेळ आतापर्यंत लांबून चालला होता, तो आता प्रत्यक्ष भेटीत आणि एकांतात पूर्ण होऊ दे. 'Danriye achho tumi aamar gaaner oparey. Amar shurguli paay choron, ami pai ne tomare. Batash bohey mori mori, aar bendhe rekho na tori. Esho...

स्मृतीबनातून - जन्माष्टमी (पद्य)

इमेज
डॉक्टर प्रतिमा जगताप यांनी आसावरी काकडे यांच्या कवितेचं केलेलं सादरीकरणा पाठवलं. श्रीकृष्ण राधेच्या अद्वैतावर सांगणारी ही कविता संध्याकाळी गाडीतून घरी परतत असताना ऐकली. तेव्हा मी यमुना सेतुवरच होतो हा निखळ योगायोग...त्यांना अभिप्राय लिहिला. त्यावर त्यांनी उत्तरा दाखल राधेवर ज्या दोन ओळी पाठवल्या त्या मला स्फुरत गेलेल्या कवितेत किंवा विचारात म्हणा चपखल बसल्या. चौथ कडवं तेच आहे... सोबत ही सर्व सृजन प्रक्रिया सुरू करणाऱ्या मूळ सादरीकरणाची लिंक ही देत आहे. मूळ सादरीकारण  क्लिक करा जन्माष्टमी यमुना जळाचे तुषार उडता शरीरी काटा आला गं  राधा-मोहन रास द्वैत सुनयनी तो अद्वैत झाला गं ll १ ll  काजळ निशा अष्टम तिथी तुरुंगात हा अवतरला गं वसुदेवाच्या डोईवरूनी कापीत फुगली यमुना, वृंदावनी पोहोचला गं ll २ ll  पुतनेसह मारून कालिया नंदा घरी गाई राखिल्या गं मथुरेचा सुपुत्र कान्हा वृंदावनी गोप गोपिकांत रमला गं ll ३ ll  गोरी राधा निळी सावळी सांग कशी झाली गं ? यमुनेलाही काही सुचेना ही गोड शिरशिरी कसली  गं? ll ४ ll  सोडून सारा संसार लौकिक ध्यास मीरेनी धरला गं  मृदुल करांन...

स्मृतीबनातून - धैर्य(पद्य)

इमेज
आज सकाळी एका मैत्रिणीशी ओळख विषयावर बोलताना कवी सुरेश भट यांचा उल्लेख झाला. मी त्यांच्यावर पूर्वी लिहिलेल्या ब्लॉग मधल्या त्यांच्याच दीपदान कवितेच्या काही ओळी वाचून दाखवताना माझ्या मनात ही शब्द दाटून आले. त्यांना ओळीत व्यक्त करण्याचा हा प्रयत्न... धैर्य झळा लागल्या अश्या शीतल सावल्यांच्या  भेटलो गळा जेव्हा एकेक स्वकीयांच्या  नाही कधी कळपात  शिरलो  कुणाच्या राहिलो सदा मग जवळ कुंपणाच्या  तुडवीत गेले जे सारासार विचारांना संवेदना विहीन केले  त्यांनीच  साऱ्यांना मीच माझे न लिहिले सन्मानपत्र त्यांनीच अखेरी केला सन्मान   सर्वत्र जगताना इतके विषारी डंख झाले सोनचंपाचे झाड मीच दारी लावले कानोसा घेत सर्व दिलासा देत गेले कृतीशून्य रिते शब्द ते ओकून गेले जीवन संगरी हुतात्मा होऊ घातलो  आप्त नव्हे मृत्यूची वाट पाहू लागलो कोणी मला कधी जवळ केलेच कोठे?  सोईने कार्य  साऱ्यांनी  उरकले होते विपरितात साऱ्या सजवित होतो जीवन सारे समिरानेच घात केला उधळले चित्र सारे कळवू नका कुणाला वृत्त हे पराभवाचे धैर्य अजुनी बाकी तुफान चक्र रोखण्याचे नितीन सप्रे niti...

स्मृतीबनातून - ओळख(पद्य)

इमेज
ओळख काय सांगू काय झाले संकटे जैसी चालुन आली मुखवटे गळाले ओळख खऱ्या चेहऱ्यांची झाली मागितले दान नव्हते कुणाला  तोवरी सारेच दानशूर होते मागता फक्त धीर थोडा  तुडतुडे शब्दांचे सोडले होते होता मार्ग सुखाचा तेव्हा सह प्रवासी सारेच झाले आणुनी आड वाटे वर सगळे एकटे सोडून गेले कळपात जंगली प्राणी मात्रांच्या काही पाळीव होते भासले  होऊन नागवी चारित्र्ये  ते पाशवी ठरले होते नितीन सप्रे nitinnsapre@gmail.com  130720241900 घोलवड 

स्मृतीबनातून - निशब्द कृती (पद्य)

इमेज
निशब्द कृती उघड्या नेत्रांस जाळी दाहकता वास्तवाची  मिटल्या पापण्यात दाटी भंगलेल्या स्वप्नांची भरून होते घेतले श्वास त्यांनी अमृताचे कळेना निःश्वास त्यांचे हे कैसे झाले विषाचे  अधरांवरचे जे प्राशिले शीतल चांदणे अवचित त्यांचे कैसे होऊन गेले निखारे स्पर्शात खास होती अशी जाणीव धुंदगंध गेला उडून आता तो रासलीलेचा सुगंध दुखावल्या भावना त्यांच्या निमित्त काही शब्द केली राख जीवनाची करुनी कृती निशब्द रूप रंग ऐहीकाचे सारे ते भुलविणारे हाक देती संग अलौकिकाचे उजळणारे नितीन सप्रे nitinnsapre@gmail.com  230420241140

स्मृतीबनातून - अलक्षीत कवी

इमेज
अलक्षीत कवी वैद्यक क्षेत्राशी संबंधित अनेकांनी साहित्य आणि संकृतीच्या प्रांतातही ध्यानाकर्षण होईल अशी उत्तम कामगिरी केली आहे. महाराष्ट्रा पुरतं बघायचं झालं तर सर्वश्री डॉक्टर श्रीराम लागू, काशिनाथ घाणेकर, मोहन आगाशे, गिरीश ओक, सलील कुलकर्णी अशी नाव पटकन डोळ्यापुढे येतात. कलेच मनाशी फार जवळच नातं आहे असं मला नेहमीच वाटतं. मनाचा शोध हा तसा आत्यंतिक गहन विषय आहे. वैद्यकशात्राचा अभ्यास करणाऱ्या मंडळींना मानवी शरीराची जडण घडण शिकत असताना त्याच्या मना कडे जाणाऱ्या गुप्त वाटेचा ही पत्ता मिळत असावा. जो जितका या वाटेवर अधिक वाटचाल करेल त्याला त्याप्रमाणात रसिकांच्या मनाची ओळख होत असावी. शरीर प्रकृतीतल्या विकृती जाणून घेण्यासाठी कराव्या लागणाऱ्या नाडी परीक्षेच्या सरावामुळे रसिकांची नाडी सुद्धा त्यांच्या हाती येत असावी असा आपला माझा एक तर्क आहे. इथे हा सगळा उहापोह करण्याचं कारण म्हणजे माझ्या शालेय दिवसां पासून कानावर पाडणारं एक अत्यंत गोड गीत. कोकीळ सुद्धा हेवा करील असा अत्यंतिक गोड गळा आणि जोडीला आकर्षक चाल यामुळे त्याकाळी या गीतानी मनात कधी कसा शिरकाव केला ते कळलंच नाही. पुढे ही हे गीत अन्य गीत...

स्मृतीबनातून निरंजनी स्वर-माणिक

इमेज
  निरंजनी स्वर-माणिक  पहिली भेट दिनांक,दिवस,महिना आठवत नाही पण ऑक्टोबर १९९१ ते ऑक्टोबर १९९२ या कालावधी दरम्यानची ही घटना. आकाशवाणी भोपाळ मधल्या श्रोता अनुसंधान विभागातली माझ्या पहिल्या नोकरीचा राजीनामा देऊन मी  आकाशवाणी मुंबई इथे कार्यक्रम विभागात रुजू झालो होतो. त्या दिवशी सकाळी साडे नऊच्या सुमारास मी नव्या आमदार निवास समोरच्या आकाशवाणी भवनात प्रवेश केला की अलीबाबाच्या गुहेत? असा प्रश्न मला पडला. तिळा तिळा दार उघड न म्हणता अलीबाबाची अफाट संपत्ती असलेली गुहा उघडावी किंवा अल्लादिनचा जादूचा दिवा न घासताही जीन प्रकट व्हावा तशी माझी स्थिती झाली. आत शिरताच सहज म्हणून डावीकडच्या अतिथी कक्षाकडे मान फिरवली. तिथे अगदी सामान्य वेशभूषेत बसलेल्या एका व्यक्ती वर नजर स्थिरावली. त्यांना कुठेतरी पाहिल्या सारखं वाटलं म्हणून मी ही तिथे गेलो. वयाच्या साधारण सहा सात वर्षां पासून आजवर सतत ऐकून मनावर मुद्रित झालेली, ‘अनंता अंत नको पाहू’, ‘अमृताहूनी गोड’, ‘त्या सावळ्या तनुचे’, ‘क्षणभर उघड नयन देवा’, ‘नका विचारू देव कसा’, ‘घन निळा लडिवाळा’, ‘कबिराचे विणतो शेले कौसल्येचा राम’, ‘विजय पताका श्रीराम...