प्रासंगिक - त्रिपुरारी स्वर पौर्णिमा
त्रिपुरारी स्वरपौर्णिमा भारतीय संस्कृतीत #IndianCulture संगीताला भरजरी उत्तुंग परंपरा आहे. शास्त्रीय संगीत, उप शास्त्रीय संगीत, सुगम संगीत, भाव संगीत, वाद्य संगीत आणि लोक संगीत अशा बहुविध प्रकारांनी संगीताचं दालन समृद्ध केलं आहे. शास्त्रीय संगीतात शास्त्राला, उप शास्त्रीय संगीतात लालित्याला, भाव संगीतात शब्दार्थाला, वाद्य संगीतात नादाला तर लोकसंगीतात भावनेला #Emotions अधिक महत्व आहे. लोकसंगीतात #Folk Music प्राधान्य क्रमात भावना, शास्त्र शुध्दतेच्या आधी मानली जाते. लोकसंगीताची नाळ हृदयस्थ भावनेशी जोडलेली असते. लोकसंगीत म्हणजे निसर्ग संगीत. प्रकृतीला निकट असल्यानं त्यात मृद गंधाचा दरवळ आहे. पहाटेच्या वेळी हरिततृणांवरचे, पुष्पदलांवरचे मोतिया दवबिंदू #Honey dew पाहताना जसं हरखून जातो तशीच अनुभूती लोकसंगीतावर आधारित रचना आणि गायनातून श्रोत्यांना मिळते. लोकसंगीताच हे मर्मस्थळ ज्या काही संगीतकारांना उमगलं, त्यात त्रिपुरा राज घराण्याशी संबद्ध असलेले, राजस रचनांचे रचयीते आणि चोखंदळ गायक सचिन देव बर्मन #SachinDebBarman यांचं नाव नि:संदेह अग्रक्रमानं घ्यावं लागेल. सचिनदा ...