प्रासंगिक - कभी ना जाओ छोडकर

' कभी ना जाओ छोड कर' प्रतिभा अथवा कुठलीही कला ही अंगीभूत असायला हवी. शिक्षण, प्रशिक्षणातून तिला पैलू पाडता येतील, पण ती निर्माण करणं निव्वळ अशक्यच. हे निसर्गाच वाण असतं. सरसकट सर्वांनाच ते मिळत नसतं. अमृतसर जिल्ह्यातल्या कोटरा सुलतान सिंग गावात 24 डिसेंबर, 1924 रोजी जन्मलेल्या बालकाला मात्र, निसर्गाची ही कृपा भरभरून लाभली. बालपणी याच्या घरा समोर एक फकिर यायचा. 'खेडन(खेलन) के दिन चार नी माए खेडन दे दिन चार' हे गीत तो गात असे. या आणि त्याच्या अन्य काही गाण्यांवर फिदा झालेला छोटा 'फिको' दूर पर्यंत त्याच्या मागे मागे जात असे. पुढे परिवार लाहोरला स्थानांतरित झाल्यावर बारा-तेरा वर्षांचा फिको मोठ्या भावाला केश कर्तनालयात मदत करता करता गाणी गुणगुणत ग्राहकांचं मनोरंजन करीत असे. त्या काळी लोकप्रिय असलेले गायक अभिनेता कुंदनलाल सहगल त्याच्या आदर्श स्थानी होते. योगायोगाने त्यांचे एका कार्यक्रमा निमित्त आकाशवाणी लाहोर इथं येणं झालं. आपल्या मोठ्या भावाच्या पाठीशी लकडा लावून फिको, सहगल यांचं गायन ऐकायला म्हणून गेला पण योगायोग असा की, गायन सादर करून परतला. कारण ऐनवेळी वीज गे...