स्मृतीबनातून-अपूर्तता(पद्य)
पद्य लेखन हा तसा माझा प्रांत नाही. कविवर्य सुरेश भट यांच्यावर लेख लिहिण्यासाठी संशोधन करत असताना त्यांच काव्य थोडं अधिक डोळसपजणे वाचलं गेलं. त्यातूनच आपणही काही खर्डावं ही उर्मी जागृत झाली. मग जे आणि जसं सुचत गेलं ते व्यक्त करू लागलो. आज त्यांच्या जन्मदिनी त्यांच्यावर लिहिलेला माझा लेख पुन्हा वाचून काही फेरबदल करत असताना अचानक ज्या काही ओळी सुचल्या त्या त्यांना मनःपूर्वक अर्पण करून तुमच्या अभिप्रायार्थ सादर.
अपूर्तता
कल्पिलेले प्रेम जे, अनुभवणे राहिले
सहृदयी मिठीत मग, विरघळणे राहिले
भावनांचे आवेग सगळे, साहण्याचे राहिले
अद्याप आहे पुरते, उध्वस्त होणे राहिले
दुखावले गेले तयांना, सुख देणे राहिले
कवटाळणे अजून, प्राणीजात राहिले
घेतलेले होते वसे ते, निभावयाचे राहिले
देणे सावळ्याचे, अजून सगळे द्यावयाचे राहिले
मिळाले जे सर्व त्याला, नमन करणे राहिले
निघता घरून त्याचे, आशीर्वाद घेणे राहिले
लिहायचे होते अजून, कितीतरी ते राहिले, उन्मुक्त आर्त गझलेला, आळवायचे राहिले.
दिल्या घेतल्या वचनांची, पूर्तता करणे राहिले
अखेरीस कैवल्य होणे, प्राण जातांना राहिले
नितीन सप्रे
नवी दिल्ली
150423
नितीनजी,
उत्तर द्याहटवाकविता करणे हा काही माझा प्रांत नाही असं म्हणत तुम्ही अतिशय सुंदर अशी काव्यरचना केलीत. क्षणभर मला सुरेश भटच तुमच्या तोंडून बोलतायत असं वाटलं. छान लिहिलंय तुम्ही. लिहीत रहा ,आवडतं मला वाचायला
काव्य रचना मनास भावली, लिहित राहा......
उत्तर द्याहटवाइतकी सुंदर रचना कविचीच होऊ शकते - खूप सुरेख, अर्थपुर्ण रचना.
उत्तर द्याहटवाभटांशी नातं सांगणारं सुरेख काव्य!
उत्तर द्याहटवा