स्मृतीबनातून-अपूर्तता(पद्य)



नमस्कार!

पद्य लेखन हा तसा माझा प्रांत नाही. कविवर्य सुरेश भट यांच्यावर लेख लिहिण्यासाठी संशोधन करत असताना त्यांच काव्य थोडं अधिक डोळसपजणे वाचलं गेलं. त्यातूनच आपणही काही खर्डावं ही उर्मी जागृत झाली. मग जे आणि जसं सुचत गेलं ते व्यक्त करू लागलो. आज त्यांच्या जन्मदिनी त्यांच्यावर लिहिलेला माझा लेख पुन्हा वाचून काही फेरबदल करत असताना अचानक ज्या काही ओळी सुचल्या त्या त्यांना मनःपूर्वक अर्पण करून तुमच्या अभिप्रायार्थ सादर.


अपूर्तता



कल्पिलेले प्रेम ते अनुभवणे राहिले
डोळ्यांतील नील स्वप्न साकारणे राहिले

उधाण रूप भावनांचे  पाहणे राहिले
उरी कुणा आवेगे जवळ घेणे राहिले

सांगावे कितीक होते ते सांगणे राहिले
मनातील काव्य सारे ऐकविणे राहिले

नियतीच्या कवेत हे विसावणे राहिले
अद्याप पुरतेच उध्वस्त होणे राहिले

कंठी सूर होते रियाज करणे राहिले
उन्मुक्त ते आर्त गीत आळवणे राहिले

दुखावले गेले त्यांना सुखवणे राहिले
प्राणिजात अजून कवटाळणे राहिले

घेतला होता वसा तो निभावणे राहिले
द्यावयाचे सावळ्याचे सारे देणे राहिले

जे मिळाले त्याला, नमन करणे राहिले
निघताना तयाचा, आशिष घेणे राहिले

वचने ती दिलेली पूर्ण करणे राहिले
साधून कैवल्य लेणे मुक्त होणे राहिले 



नितीन सप्रे

नवी दिल्ली

150423


टीप:  सुरेश भट लेख


टिप्पण्या

  1. नितीनजी,
    कविता करणे हा काही माझा प्रांत नाही असं म्हणत तुम्ही अतिशय सुंदर अशी काव्यरचना केलीत. क्षणभर मला सुरेश भटच तुमच्या तोंडून बोलतायत असं वाटलं. छान लिहिलंय तुम्ही. लिहीत रहा ,आवडतं मला वाचायला

    उत्तर द्याहटवा
  2. इतकी सुंदर रचना कविचीच होऊ शकते - खूप सुरेख, अर्थपुर्ण रचना.

    उत्तर द्याहटवा
  3. भटांशी नातं सांगणारं सुरेख काव्य!

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

प्रासंगिक- वसंतवैभव-कैवल्य गान

स्मृतीबनातून–सुधीर स्वरलालित्य

स्मृतीबनातून - देखण्या ‘बाकी’ काव्यपंक्ती