स्मृतीबनातून - ध्यास मिलनाचा(गीतांजली पद्य 38)
ही कविता ईश्वराप्रती किंवा एका सर्वोच्च सत्याप्रती असलेल्या ओढीचे वर्णन करते. कवी म्हणतात की संसारातील इतर सर्व इच्छा केवळ भ्रम आहेत; मनाच्या खोलवर फक्त तुझीच आस आहे, जशी रात्रीला प्रकाशाची असते आणि वादळाला शांततेची असते.
1.
चाई गो तोमारे शुधु चाई—
आमार हृदय कहे ताई।
दिबस-रजनी यत मत्तता जागे मोर,
सबई मिछे, सबई घोर—
सबाकार अन्तरेते शुधु एई एक तान,
चाई गो तोमारे शुधु चाई।
येमनि निबिड़ निशा आँधार लुकाये राखे
आलोर करुण प्रार्थनाके,
तेमनि गभीर मम अबचेतनार तले
एकटि व्याकुल बाणी ज्वले—
चाई गो तोमारे शुधु चाई।
झड़ यबे शान्त हते चाय असीम शान्तिर साथे
निजेरे हानिया प्रतिघाते,
तेमनि आमार यत विद्रोहेर हाहाकार
तोमारे घिरिया मरे आर बार बार—
चाई गो तोमारे शुधु चाई।
आस या जीवास तूच मज हवास
सांगते हृदय मज सतत हेच
दिनरात उसळे चंचलता मनात
जाणी व्यर्थ सर्व तो असे भास एक
उठी अंतरातून एकच तो सूर
आस या जीवास तूच मज हवास
घन तिमिरात जशी ती काळी रात
लपवून तेज स्तुती व्याकुळ एक
तसाच या अचेतन मनात खोल
धगधगतो एकच तो ध्यास नित्य
आस या जीवास तूच मज हवास
वादळ स्वतःवर आघात करून
अथांग शांतीत त्या थकून विलीन
तसाच मनीचा हा विद्रोही आक्रोश
विसावतो तुज भवताली फिरून
आस या जीवास तूच मज हवास
2.
'That I want thee, only thee - let my heart repeat without end. All desires that distract me, day and night, are false and empty to the core.
As the night keeps hidden in its gloom the petition for light, even thus in the depth of my unconsciousness rings the cry - 'I want thee, only thee'.
As the storm still seeks its end in peace when it strikes against peace with all its might, even thus my rebellion strikes against thy love and still its cry is - 'I want thee, only thee'(Geetanjali 38)
ध्यास मिलनाचा
संगे तुझ्या व्हावे मिलन ध्यास हृदयी हाच अविरत
भासमान काजळी वासना छळती मज त्या निरंतर
आस एकच नित्य वसते सकल जनांच्या अंतरात
संगे तुझ्या व्हावे मिलन ध्यास हृदयी हाच अविरत
निशा जशी लपविते प्रकाश आस, स्वघन तिमिरात
दडली ओढ तव दर्शनाची सखोल अचेत मनात
संगे तुझ्या व्हावे मिलन ध्यास हृदयी हाच अविरत
सुप्त मनाच्या सखोल गाभाऱ्यात सूर एक तो ज्वलंत
तुझ्याच रे प्रीतीचा टाहो राही सतत सुरू अंतरात
संगे तुझ्या व्हावे मिलन ध्यास हृदयी हाच अविरत
संगे तुझ्या व्हावे मिलन ध्यास हृदयी हाच अविरत
नितीन सप्रे
nitinnsapre@gmail.com
030920240830
नवी दिल्ली

अप्रतिम भावानुवाद
उत्तर द्याहटवा'ध्यास मीलनाचा' हा भावानुवाद तुमचा उत्कृष्टतेचा ध्यास दर्शवतो.खूप छान !
उत्तर द्याहटवा