स्मृतीबनातून एकच नमस्कार(पद्य १४८ 103)


ही कविता पूर्णपणे 'शरणागती' (Surrender) या भावावर आधारित आहे. टागोर येथे चार महत्त्वाच्या प्रतिमा वापरतात:

  1. देह: जो पूर्ण जगामध्ये ईश्वराचे अस्तित्व पाहतो.
  2. मन: जे पावसाळी ढगाप्रमाणे भक्तीने ओथंबलेले आहे.
  3. कला (गाणी): जी शेवटी शांततेत विरून जातात.
  4. प्राण: जे घरट्याकडे परतणाऱ्या पक्ष्याप्रमाणे ईश्वराकडे धाव घेतात.


(एकटी नमस्कारे प्रभू)

In one salutation to thee, my God, let all my senses spread out and touch this world at thy feet.

Like a rain-cloud of July hung low with its burden of unshed showers let all my mind bend down at thy door in one salutation to thee.

Let all my songs gather together their diverse strains into a single current and flow to a sea of silence in one salutation to thee.

Like a flock of homesick cranes flying night and day back to their mountain nests let all my life take its voyage to its eternal home in one salutation to thee.

Original Bengali

एकटि नमस्कारे प्रभु

​एकटि नमस्कारे प्रभु, एकटि नमस्कारे

सकल देह लूटिये पडुक तोमार ए संसारे॥

​श्रवणभावे आषाढेर मेघ नामे येमन निचाए

सकल मन झुकिये पडुक तोमार दुयारे॥

​सकल गानर सुरेर धारा एकत्रे पालोये

निरवतार महासमुद्रे पड़ुक नामिये॥

​मानस-हंस येमन कोरे उड़े चले आपन बासाये

तैमनि आमार सकल जीवन चलुक तोमार दिशाये॥


​ही

एकच नमस्कार

एकच नमस्कार 

देवा एकच नमस्कार

मायारूपी तव संसार चरणास

माझा साष्टांग नमस्कार


जलभारे गाभूळ श्रावण

जलदापरी नम्र होऊन 

तुझ्या द्वारी विनम्र होईन 

नत माझे हे अवघे मन

एकच नमस्कार 

देवा एकच नमस्कार


गीतांचे स्वर एक होऊन

अखंडित होऊ दे हे गान

सारे माझे ते स्वत्व सोडून

व्हावे शांतीसागरी विलीन

एकच नमस्कार 

देवा एकच नमस्कार


क्रौंच पक्षी घरट्याच्या प्रीतीनं 

परततो दिनरात उडून

व्हावा माझा प्रवास जीवन

तव चरणी आहे निकेतन

अखेरचा नमस्कार 

देवा अखेरचा नमस्कार


(गीतांजली बांगला १४८ इंग्रजी 103)


नितीन सप्रे

nitinnsapre@gmail.com 

1003202502035






 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

प्रासंगिक- वसंतवैभव-कैवल्य गान

स्मृतीबनातून–सुधीर स्वरलालित्य

स्मृतीबनातून - देखण्या ‘बाकी’ काव्यपंक्ती