स्मृतीबनातून – भरती(गीतांजली पद्य ९)

भरती आनंदेरई सागर थेके (९) आनंद सागरास आज अशी भरती आली वल्हवा जीवन नौका तुम्ही दृढ राहुनी घ्या लादून नौकेत ती दुःखे सारी निर्धार पार जाण्याचा पातला मृत्यू जरी आनंद सागरास आज अशी भरती आली कोण रे तो मागुती फिरण्यास सांगतो कोण रे तो अशी मनाई करतो उत्सव काळी कोण भयाचे स्मरण करतो भय तुमचे ते आम्ही सर्व जाणतो कुठली ग्रहपीडा अन् कुठला शाप तो? सुखे किनारी का बसून राहण्यास सांगतो? धाडसाने धरा रे शिडाच्या दोऱ्या सर्व गाऊ या मिळून सुरेल गीत पर्व आनंद सागरास आज अशी भरती आली नितीन सप्रे nitinnsapre@gmail.com 010420251645 क्लिक करा – आनंदेरई सागर थेके