पोस्ट्स

डिसेंबर, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

स्मृतीबनातून – जिंदादिल भाऊसाहेब

इमेज
जिंदादिल मराठी शायर    " शायरी नुसतीच नाही गावया आलो इथे कोणत्यातरी जिंदादिलांच्या दर्शना आलो इथे प्राण साऱ्या मैफलीचे,यांनाच आम्ही मानतो नुसतेच ना या मैफलीचे, आमुचे स्वतःचे मानतो " मराठी शायरी आणि शायर  तसं बघायला गेलं तर ती त्यांच्या आयुष्यात खूप उशिरा म्हणजे पन्नाशी उलटून गेल्यावर आली. ती नखशिखांत अस्सल मराठमोळी होती. तिच्यात उर्दू शब्दवती(रूपवती चाय धर्तीवर) सारखीच विलक्षण कमनियता आहे, तशीच पुरेपूर नजाकत देखील; पण अनुनय लवलेश मात्र ही नाही. ती पूर्णतः स्वयंभू आहे. ती आहे मराठी शायरी. निवृत्ती नंतर अनेकांच्या आयुष्याचा प्रवास जिथे रुक्ष, निरस वाटेनी होताना दिसतो तिथे  अस्सल मराठी शायरी ही साठीतल्या एका जिंदादिल व्यक्ती वर भाळली. कोण होती ही व्यक्ती? ती होती मराठी शायरीची उद्गाती, वासुदेव वामन पाटणकर उर्फ भाऊसाहेब. त्यांनी श्रृंगार, विनोद, जन्म, मृत्यू, दर्शन आदी विविध विषयस्पर्शी सशक्त आणि रसरशित शायरी साठोत्तरी आयुष्यात लिहून तरुणाईला त्याची लज्जत चाखायला दिली. त्यांनी लिहिलेली शायरी अस्सल मराठी आहे. ती उर्दुतून भाषांतरित केलेली तर नाहीच नाही ...

स्मृतीबनातून – चुकावे परी प्रीतिरूपी उरावे

इमेज
  चुकावे परी प्रीतिरूपी उरावे प्रास्ताविक ‘ To err is human’ ही इंग्रजी म्हण आपणा सर्वांना सुपरिचित आहे. चुका होणं, करणं हा सर्वसाधारण मनुष्य स्वभाव आहे. अर्थात म्हणून चुकांच कुणी समर्थन करायला जाऊ नये. शिवाय त्यांची पुनरुक्ती तर अवश्य टाळलीच पाहिजे.  नवीन चुका झाल्या तर एकवेळ हरकत नाही पण तीच ती चूक परत परत करणं मात्र खचितच पूर्णतः चुकीच आहे. बरं,  झालेल्या किंवा केलेल्या चुकांच समर्थन करायचं, अवडंबर माजवायचं की त्या मान्य करून जीवनधारा प्रवाही ठेवायची हे ज्याच्या त्याच्या विवेक बुद्धीवर निर्भर असतं. प्रितीच्या प्रदेशात प्रेमभावना जर खरी असेल तर तिथे कुणी कितीही चुका केल्या तरी क्षमाशीलतेचीच कास धरणं हे सर्वार्थानं श्रेयस्कर. तिथे चुकांपेक्षा प्रेम अधिक महत्त्वाचं असतं. चूक की बरोबर यापेक्षा प्रेम अनमोल असतं, नाही का? बहुदा म्हणूनच ‘ लाख चुका असतील केल्या, केली पण प्रीत’ ...असं प्रामाणिक कथन, कुठलाही अभिनिवेश न बाळगता  तो किंवा ती  मोकळ्या मनानी करू शकते. काव्य सौंदर्य आणि संगीत आपल्या शब्द लालित्य भांडारातून नेमके शब्द हेरून उत्कृष्ट तरल भाव निर्मिती करण्यात प...

स्मृतीबनातून – उदयोस्तु(पद्य)

इमेज
उदयोस्तु  ओढून केशरी रजाई निद्रेत होती अवनी तेजाळ शुक्र तारा गेला हळू निघूनी  कोवळी लाल किरणं अवघ्या क्षितिजावर शिंपूनी उदयास मित्र आला पूर्वा नाहली तेजानी झुलत्या पर्णांवरी दहिवर चमकती ते खुशीनी मिटल्या कलिका फुलांच्या सांडती गंध उमलूनी फिरला गंधीत वारा गेला सुगंध वाटूनी  उदयास मित्र आला पूर्वा नाहली तेजानी किलबिल पाखरांची मग गोड आली कानी चैतन्य नाचले सर्वत्र सोडली निद्रा जगानी प्रभा नवी समोरी पातली सुहास्य वदनी उदयास मित्र आला पूर्वा नाहली तेजानी (दहिवर–दवबिंदू) नितीन सप्रे nitinnsapre@gmail.com  221220250900 Nagpur 

स्मृतीबनातून –झूठे नहीं जूठे नैन

इमेज
झूठे नहीं  जूठे  नैन  चाला वाही सकाळी डोळे उघडले ते समुद्र सपाटी पासून साधारण  11 हजार फूट उंचीवर असलेल्या लेह या हिमालयाच्या कुशीत वसलेल्या छोट्या शहरात. सुदैवाने प्राणवायूची कमतरता तितकीशी जाणवत नव्हती त्यामुळे प्राणपाखरू विचरण करण्यासाठी सज्ज होतं. नाश्ता आटोपून  14 हजार फूट उंचीवरच्या पॅनगोँग लेक वर जाण्यासाठी निघालो.    काही थोडा काळ रस्ता होता. मात्र पुढे बहुतेक मार्गक्रमणा खडकाळ कारवाटे( जर पायवाटेवरून वरून म्हणतो तर कारवाटेवरून का नाही?)वरून झाली.  बाहेर पाहिलं तर सर्वत्र चमकणाऱ्या पांढऱ्याशुभ्र त्रिकोणी टोप्या घातलेली हिमशिखरं स्वागताला उभी होती. अधून मधून क्वचित कुठे दिसणारी खुरटी हिरवी झुडपं सोडली तर  निळशार लख्ख आकाश आणि खाली जणू राखाडी वस्त्र ल्यायलेला खडकाळ भूप्रदेश. उंच पहाडां मधलं वाळवंटच जणुकाही.  प्रवासात संगीताची सोबत आवश्यकच. योगायोग म्हणजे पहाडी वाळवंटातील प्रवासा दरम्यान पठारावरच्या वाळवंटी प्रदेशाच चित्रण असलेल्या लेकीन चित्रपटातील सत्यशील देशपांडे यांच्या आवाजातील  विलंबित ख्याल  ‘ निके घूँघरिया ठुमकत चा...

स्मृतीबनातून – ऐ, ज़िन्दगी गले लगा ले

इमेज
ऐ, ज़िन्दगी गले लगा ले मानवी नातेसंबंधांचा प्रांत हा बरेचदा काहीसा गूढ, अनाकलनीय असा असतो. निसर्गचक्रात  पानं फुलं यांच्या बहरण्याला, कोमेजण्याला जसे काही नियम असतात, ऋतुमान असतं तसे ते मानवी नाते संबंधात आढळतीलंच याची काही खात्री नाही. इथे येणारा बहर किंवा शिशिर; हा समज, गैरसमज, संशय, अहंकार, उपयुक्तता, अपघात यासारख्या गोष्टींवर अवलंबून असतो. कधी कुणा अपरिचित अथवा वर्षानुवर्ष संबंध नसलेल्यां लोकांमध्ये अतर्क्य जवळीक साधली जाते तर कधी अनेक वर्षांच्या स्नेह संबंधात अगदी रक्ताच्या नात्यातही असा काही दुरावा, रुक्षता येते की ज्याची स्वप्नातही कल्पना केली जाऊ शकत नाही. तर कधी परिस्थित अशी निर्माण होते की दूर गेलेले जवळ येतात आणि जवळ असलेले कायमचे दुरावतात.  अर्थात सगळ्यांच्या बाबतीत आणि प्रत्येक वेळी  नकारात्मकच काही घडेल असंही नाही. समाज माध्यमावर वाचनात आलेल्या एका लेखामुळे विचारचक्राला गती मिळाली आणि अगदी कॉलेजच्या दिवसात पाहिलेल्या कमल हसन, श्रीदेवी यांच्या सदमा चित्रपटाची कथा आठवली. स्नेहलता(श्रीदेवी)  ही कॉलेज तरुणीला एका कार अपघातात डोक्याला मार बसातो. तिचा स्मृतीलो...