हृदयस्थ स्वांत सुखाय कुटुंबातलं शेंडेफळ. सभा, समारंभ, कार्यक्रम, मैफिलीत श्रीफळानं सन्मानित होणारं, भावंडांच्या हृदयस्थ असणारं व्यक्तिमत्त्व म्हणजे हृदयनाथ! हृदयनाथ यांच सांगितिक काम हे प्रामुख्यानं स्वांत सुखाय अशा स्वरूपाचं आहे. कलाकाराला ही पोट असतं यात दुमत असायचं काही कारणच नाही, पण म्हणून कोणताही पूर्णवेळ कलाकार कलेकडे संपूर्ण धंदेवाईक दृष्टिकोनातून पाहू लागला आणि बिनदिक्कत तडजोडी स्वीकारु लागला तर मात्र कला सपक होणं अपरिहार्य असतं. अर्थात ही बाब सर्वच क्षेत्रांना लागू आहे. कलेच्या प्रांतात ती प्रकर्षानं टाळली पाहिजे असं वाटण्याचं कारण, अन्य क्षेत्रात शिक्षण प्रशिक्षणानी योग्यता प्राप्त करता येते, मात्र कलेच्या सिद्धतेसाठी ईश्वरीय अधिष्ठान अधिक महत्त्वपूर्ण ठरतं. रसिकांच्या सुदैवानं हृदयनाथ यांच्या सांगितिक कारकीर्दीत याचं पुरेपूर भान राखलं गेल्याच जाणवतं. हृदयनाथ मंगेशकर यांच्या सुदैवानं मनात आणि गळ्यात स्वरांचा गांगौघ लाभलेल्या कुटुंबात त्यांना जन्म मिळाला, त्यामुळे त्यांची कारकीर्द राजहंसाच्या जलविहारा सारखी डौलदार झाली, बदकाचं पोहणं होण्यापासून बचावली. सहा दशकांची अभिजात कार...
मोजक्याच शब्दांत स्वराशा अनुभवली....
उत्तर द्याहटवामोजक्याच शब्दांत स्वराशा अनुभवली.
उत्तर द्याहटवासमर्पक शब्दात श्रद्धांजली
उत्तर द्याहटवा