स्मृतीबनातून - आशा(पद्य)





आशेचा स्वर

स्वरावली ही उदास झाली

सोडुनी रसिका आशा गेली


सूर तुझ्या कंठातून येता

अंगावरती धुंद शहारा


फिरत आगळी गळ्यात सुंदर

गीतास लाभते रूप मनोहर


भाव नाट्य चित्र गीत गझल

साऱ्याच विधा तुझ्या तरल 


तृप्त केलेस लौकिक जीवा

रिझव आता अलौकिक देवा




नितीन सप्रे

nitinnsapre@gmail.com 

1204261830

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

प्रासंगिक- वसंतवैभव-कैवल्य गान

स्मृतीबनातून - देखण्या ‘बाकी’ काव्यपंक्ती

स्मृतीबनातून–सुधीर स्वरलालित्य