स्मृतीबनातून – एकांत(पद्य)

 

एकांत



आज फिरून आठवांचे, दाटून अभ्र आले 

सरोवर डोळ्यांचे, अश्रूंनी तुडुंब भरले


या कातर संध्याकाळी, सोबतीस नाही कोणी 

शेवही तिचा नव्हता, थोपविण्यास ते पाणी


एकांत निशेचा सारा, तो असह्य जीवघेणा

आस उषेची होती, परी सरता रात सरेना


रोखला हुंदका कंठी, ओठी ठेवले स्मितास

उमजून जगरीती ही, मी जपले एकांतास 


नितीन सप्रे

220520261600



टिप्पण्या

  1. आयुयष्यात कधीतरी अशा एकांताची गरज सगळ्यांनाचं पडते. एकांत फार बोलका असतो.
    सुंदर रचना. 🙏💐

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

प्रासंगिक- वसंतवैभव-कैवल्य गान

स्मृतीबनातून–सुधीर स्वरलालित्य

स्मृतीबनातून - देखण्या ‘बाकी’ काव्यपंक्ती