स्मृतीबनातून – एकांत(पद्य)
एकांत
आज फिरून आठवांचे, दाटून अभ्र आले
सरोवर डोळ्यांचे, अश्रूंनी तुडुंब भरले
या कातर संध्याकाळी, सोबतीस नाही कोणी
शेवही तिचा नव्हता, थोपविण्यास ते पाणी
एकांत निशेचा सारा, तो असह्य जीवघेणा
आस उषेची होती, परी सरता रात सरेना
रोखला हुंदका कंठी, ओठी ठेवले स्मितास
उमजून जगरीती ही, मी जपले एकांतास
नितीन सप्रे
220520261600

आयुयष्यात कधीतरी अशा एकांताची गरज सगळ्यांनाचं पडते. एकांत फार बोलका असतो.
उत्तर द्याहटवासुंदर रचना. 🙏💐