स्मृतीबनातून –स्वरशब्द स्मृती(पद्य)
स्वरशब्द स्मृती
सुमन हे असे कोणते
स्वरशब्द छान जाणते
वाऱ्यावरती घेत लकेरी
गातात जणू जल लहरी
सहज असे कधी दुपारी
आपणास ते गुपित सांगी
मृदुल करांनी हळूवार
छेडित जाते हृदय तार
आस आहे अंतरी सांगते
आसरा हृदयात मागते
सख्याचे एक गीत ऐकते
स्वरांनी धुंद होऊन जाते
शब्द शब्द ते ठेवी जपून
बकुळीच्या सुगंधा समान
केतकी वनी नाचे मयुर
नभात मेघ गहिवरत
दारी मग पडता पाऊस
सुगंध मातीचा पसरत
सागरास धरणी मिळते
तिथे आपुली वाट पहाते
नयन बोलता काहीतरी
ते खुळे हासते खुळ्यापरी
काहूर मनी येते दाटून
दिनरात तयाला स्मरून
झरती त्या झिमझिम धारा
रात कधी ती उदास जाता
विचारे आठवते का सारे?
मन दवात होता हळवे
पहिलीच जशी भेट होते
दो नयनांची जादू घडते
उघडी एक चंदनी दार
सजवते सोन्याचा संसार
गेले जरी ते आता विरून
क्षणोक्षणी होईल स्मरण
नितीन सप्रे
040620261030

सुमनताईंच्याच भावगीतील निवडक काव्यसुमन पंक्तींची ही गुंफलेली सुमनमालेची
उत्तर द्याहटवाभावाञ्ली खूपच अभिनव आणि ह्रदयस्पर्शी !
🙏🙏🙏