स्मृतीबनातून – सुगती गाठण्यापूर्वी आहे प्रवास बाकी


डेफोडील्स या विल्यम वर्डसवर्थ यांच्या कवितेचा मराठी भावानुवाद केल्यानंतर गृहपाठ मिळाला. करून पाहिला.

मूळ कविता

And miles to go before I sleep.

रॉबर्ट फ्रॉस्ट


Whose woods these are I think I know. His house is in the village though; He will not see me stopping here To watch his woods fill up with snow.


My little horse must think it queer To stop without a farmhouse near Between the woods and frozen lake The darkest evening of the year.


He gives his harness bells a shake To ask if there is some mistake. The only other sound's the sweep Of easy wind and downy flake.


The woods are lovely, dark and deep. But I have promises to keep, And miles to go before I sleep, And miles to go before I sleep.



भावानुवाद 

सुगती गाठण्यापूर्वी आहे प्रवास बाकी

जंगल हे कुणाचे बहुतेक जाणतो मी 

मालक खास याचा तो येथे राहत नाही 

कळणार कसे त्या जरी थांबलो इथे मी 

मोहून पाहण्या ते शुभ्र लावण्य हिमानी ll१ll

अश्व सोबतीचे ते घुंगरमाळ वाजवी 

नाकळे त्याला परी थांबलो इथे का वनी 

विश्राम धाम नाही गोठला ताल काननी 

वर्षाच्या या लांब अन मिट्ट काळोख्या रात्री ll२ll


करुनी नाद घंटीचा विचारी तो मजसी 

थांबण्यात काही चूक तर नाही घडली 

घंटे शिवाय अन्य नाद हेच येती कानी 

मंद झुळूक अन् हिम वर्षावाचा ध्वनी ll३ll


गडद गूढ जंगल हे घेते आकर्षूनी

परि आहेत पाळायाची वचने जी दिली 

अंतिम स्थानका आधी अद्याप प्रवास बाकी 

सुगती गाठण्यापूर्वी आहे प्रवास बाकी ll४ll


नितीन सप्रे

070920261130

टिप्पण्या

  1. Robert Forst ह्याने लिहिलेल्या कवितेचा भावानुवाद आपण छानच केला आहे.
    Original कविता वाचताना सर्व ओळी एकाखाली एक न येता, त्या एकापाठोपाठ एक (गद्य स्वरुपी ) आलेल्या असल्याने मूळ इंग्रजी कविता वाचताना खटकतं. मूळ कविता खालील प्रमाणे असावी असं वाटतं ---


    Whose woods these are I think I know.
    His house is in the village though;
    He will not see me stopping here
    To watch his woods fill up with snow.

    My little horse must think it queer
    To stop without a farmhouse near
    Between the woods and frozen lake
    The darkest evening of the year.

    He gives his harness bells a shake
    To ask if there is some mistake.
    The only other sound's thesweep
    Of easy wind and downy flake.

    The woods are lovely, dark and deep.
    But I have promises to keep,
    And miles to go before I sleep,
    And miles to go before I sleep.

    उत्तर द्याहटवा
  2. नितीन जी,
    कितीतरी वेळा रॉबर्ट फ्रॉस्ट यांची मूळ कविता वाचलेली. एक मोठा संदेश देते ही कविता.
    भावानुवाद इतका सुंदर की केवळ अनुवाद वाचनात आला तरीही तोच संदेश मिळतो. खरा भावानुवाद 💐🙏👍

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

प्रासंगिक - उड्डाण परी- कॅप्टन जोया

स्मृतीबनातून - हृदयस्थ

प्रासंगिक - कभी ना जाओ छोडकर