स्मृतीबनातून – अविनाशी(पद्य)
— Clare Harner, The Gypsy, December 1934
मम कलेवरापाशी ढाळू नकोस अश्रू
देहात त्या मी नाही; मज कधी नाही मृत्यू
मी आहे तो निरंतर वाहणारा समीर
मी हिमावर हिऱ्याचे चमकते किरण
मी गाभूळ ओंब्यांवरचा सोनेरी प्रकाश
मी झिमझिम झरती रेशिम वर्षा सर
उठतोस तू जेव्हा प्रभात समयी शांत
तेव्हा मी असतो वेगवान वरची झेप
गोल लयीत उडत्या ती खगांची मी माळ
येई रजनी लांघून तो मी अरुणोदय
माझ्या कलेवरापाशी ढाळू नकोस अश्रू देहात त्या मी नाही; मज कधी नाही मृत्यू
नितीन सप्रे
250920261100

एकदम सुंदर आणि मनभावक भावानुवाद
उत्तर द्याहटवा