स्मृतीबनातून - कुरुभूमी(पद्य)

 




कुरुभूमी


सरत आले आयुष्य तरीही, अद्याप भेटला नाही सखा

मी कोण? कुणाचा काय? हे अजूनही उमगले नाही मला 


चालताना भेटले वाटेत जे जे, मानीले मी त्यांना सोबती 

जैसा साधून झाला स्वार्थ त्यांचा क्षणी त्याच साथ ते सोडती



सहृदयी सख्याचा शोध घेणे, बेकार आहे हे मी जाणले

लोकहो भेटले वाटेत जे जे, ते ते वाट आपुली चालले


उगीच मी जीवाचे रान केले, जोमाने मांडल्या त्यांच्या व्यथा

शोष मज जसा लागला, ते म्हणू लागले भांडतो का वृथा?


नसतो कुणी कुणाचा या जगी, जीवनाचे मर्म मी जाणले

कुरुभूमीवर आपुल्यानीच आपुल्यांचे रुधिर सांडले


नितीन सप्रे, दिल्ली

300323


टिप्पण्या

  1. वा भाई वा।
    क्या बात है
    सोडावा एखाद दूसरा
    बाकी जगी या
    स्वार्थी लोकांचा पसारा.
    नितीनजी वास्तवाचं दर्शन घडविणारी आशयघनकविता.

    उत्तर द्याहटवा
  2. खूपच वास्तववादी कविता ! कोणी नसे कुणाचे हेच सत्य फार नेमकेपणाने मांडले आहे.

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

प्रासंगिक- वसंतवैभव-कैवल्य गान

स्मृतीबनातून–सुधीर स्वरलालित्य

स्मृतीबनातून - देखण्या ‘बाकी’ काव्यपंक्ती