बहुसंख्य मानव तथाकथित सात्विक जीवन आचरून, पाप-पुण्याचं अनावश्यक स्तोम माजवून, उपास-तापास, व्रत-वैकल्य करून, त्या सर्व शक्तिशाली नियंत्या कडे बहुतेकदा अशाश्वत लौकिक गोष्टींसाठी वशिला लावतो तेव्हा परमेश्वर माणसाच्या बुद्धीची कीव करत असावा… वशिला याचना आयुष्याची ही करतो कशाला? जगण्यासाठी का उगा लावतो वशिला? जन्मतः चुकीच्या कल्पनांचा जन्म झाला गोंजारून घेण्यातच शैशवी काळ गेला ज्याच्यावरी निस्सीम होते प्रेम केले यौवनाने त्या विषय मोहजाली गुंतविले अटळ आहे जर जरा ही का मिरवू नये तिला ही? अन् अखेरी जीवन व्रताच्या सांगतेला आळवू का नये कैवल्य भैरविला? नितीन सप्रे nitinnsapre@gmail.com नवी दिल्ली (1907231025)