पोस्ट्स

ऑक्टोबर, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

स्मृतीबनातून - अखेरचा पडदा(पद्य

इमेज
know that the day will come when my sight of this earth shall be lost, and life will take its leave in silence, drawing the last curtain over my eyes.Yet stars will watch at night, and morning rise as before, and hours heave like sea waves casting up pleasures and pains. When I think of this end of my moments, the barrier of the moments breaks and I see by the light of death thy world with its careless treasures. Rare is its lowliest seat, rare is its meanest of lives. Things that I longed for in vain and things that I got —-let them pass. Let me but truly possess the things that I ever spurned and overlooked. गुरुदेव टागोर यांची लास्ट कर्टन (Last Curtain) कविता मर्त्य लोकीच अंतिम सत्य कथन करतानाच  लौकिक संपदेच्या वैयर्थतेवर भाष्य करते. जीवनात ज्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो, ज्यांचा तिरस्कार करतो त्यांचे वास्तविक मूल्य अखेरच्या क्षणी जाणवते हे गुरुदेवांनी या कवितेद्वारे मांडले आहे. मूळ बंगाली कविता इंग्रजीतून समजून घेतल्यानंतर स्फुरलेला हा भावानुवाद... अखेरचा पडदा जाणतो, दिवस एक तो ...

स्मृतीबनातून - स्वरअर्णव अमृताचा(पद्य)

इमेज
तितिक्षा इंटरनॅशनल आयोजित  गानसम्राज्ञी लता मंगेशकर जन्मदिनानिमित्त  विशेष काव्य लेखन स्पर्धा...श्रेणी ...प्रथम पुरस्कार जाहीर दि.२८-९-२०२४ विषय.. लता मंगेशकर आणि संगीत स्वरअर्णव अमृताचा नितीन सप्रे, नवी दिल्ली 9869375422 स्वरअर्णव अमृताचा हे हेमलते कसे वर्णावे तव गान ते कंठी तुझ्या वसती साक्षात सप्त सूर ते गंधार युक्त सूरांनी तुझ्या अवघे विश्व व्यापले स्वर रश्मींनी तुझ्या कसे विश्व हे आलोकिले जन्म घेण्या आधीच दैविगुण तातांनी जाणले जगतरत्न होऊनी लते ते तू सत्य ठरविले गायलीस तू 'कल्प वृक्ष लावूनिया बाबा' गेले शोभली कन्या झाली वट वृक्ष श्रीमंगेश कृपेने सूरां विना तुझ्या जग असुर असते वाटले  धन्य झालो आम्ही जगलो तुझ्या सूरां सवे अजर झालो सारे आम्ही ऐकोनी तुझी गीते अ र्णव अमृताचा कोकीळ कंठातील तुझे सूर ते (टीप: लता दीदी यांचं मूळ नाव हेमा हर्डीकर म्हणून हेमलते, अर्णव=समुद्र) नितीन सप्रे nitinnsapre@gmail.com  9869375422

स्मृतीबनातून - मी'पण बुडू दे अश्रूसागरी(पद्य)

इमेज
ब्राम्हो समाजाच्या ब्राम्होत्सवात 2 मे 1883 रोजी कोलकाता(उत्तर) इथे श्रीरामकृष्ण परमहंस आणि गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांची काशिश्वर मित्रा कुटुंबियांच्या घरी पहिली आणि अखेरची भेट झाली अशी माहिती मिळते. ब्राह्मोत्सवासाठी  ते दोघेही निमंत्रित होते. त्यावेळी टागोर 22 वर्षांचे होते आणि त्यांनी पियानो वाजवून आपलं एक गीत श्रीरामकृष्ण यांच्या सम्मुख सादर केलं. माझी DD इंडिया मधील एक बंगाली सहकारी श्रेया मुखर्जी हिने मला या संदर्भात माहिती देत मूळ बंगाली गीत पाठवलं त्याचा इंग्रजी अनुवाद वाचून केलेला हा मराठी भावानुवाद... Songs the worship 492  (amar matha nata kare) Bow my head under your feet. Drown all my pride in tears. To glorify myself is to dishonor myself. All you have to do is spin around and die. Drown all my pride in tears. Let me not promote my own work, Make your wish in my life. Jachi, O Thy supreme peace, Parane Thy supreme Kanti, Hide me and stand in the lotus heart. Drown all my pride in tears. Raga: Emankalyan Rhythm: Teora Date of Composition (Bangabda): 1313 Date of...

स्मृतीबनातून - प्रवास (पद्य 12)

इमेज
गुरुदेव टागोर यांच्या गीतांजलीतील हे बारावे पुष्प. यात आत्मा परमात्म्याशी संवाद साधतो आहे. तुझ्या पर्यंत पोहोचण्यासाठी मी फार लांबचा प्रवास करून, भावसागर तरुन आलो आहे. असं कवी म्हणतो आहे. खरं पाहिलं तर हा मार्ग सोपा आहे पण ज्ञान चक्षुं ऐवजी चर्म चक्षुंचा वापर केल्याने तो जटील वाटतो. खरंतर तो अंतर्यामीच आहे. निकट आहे पण माणूस त्याला दूर दूर शोधतो. सरल,साध्या मनानी त्याची प्राप्ती लावर होऊ शकते. The time that my journey takes is long and the way of it long. I came out on the chariot of the first gleam of light, and pursued my voyage through the wildernesses of worlds leaving my track on many a star and planet. It is the most distant course that comes nearest to thyself, and that training is the most intricate which leads to the utter simplicity of a tune.(Geetanjali song 12) प्रवास प्रवास हा माझा लांबचा, अनेक जन्म जन्मांतरीचा आलो रश्मी रथातून, जनन मरणाचा करीत फेरा जे निकट ते सुदूर, लाभण्या दे सुबोधता नितीन सप्रे nitinnsapre@gmail.com  091020241844 नवी दिल्ली

स्मृतीबनातून - सेवा(पद्य 10)

इमेज
गीतांजली हा गुरुदेव टागोर यांचा इशस्तुती पर कविता संग्रह आहे. या कवितेत त्यांनी ईश्वर हा दीनांचा कैवारी, अनाथांचा नाथ आहे असं म्हटलं आहे. नतमस्तक होऊन रंजल्या गांजल्यांची सेवा करणं हाच त्याच्या पर्यंत पोहोचण्याचा राजमार्ग आहे असा संदेश ते या कवितेतून देतात. Here is thy footstool and there rest thy feet where live the poorest, and lowliest, and lost. When I try to bow to thee, my obeisance cannot reach down to the depth where thy feet rest among the poorest, and lowliest, and lost. Pride can never approach to where thou walkest in the clothes of the humble among the poorest, and lowliest, and lost.  My heart can never find its way to where thou keepest company with the companionless among the poorest, the lowliest, and the lost.(Geetanjali song 10) सेवा विसावले चरण तुझे,  वसले  रंजले गांजले जेथे नतमस्तक मी, शीर्ष परी न पोहोचते तेथे तू भाव भुकेला, गर्वासंगे समीप यावे कसे अनाथांच्या नाथा,   दावी मार्ग तो सेवेचा कृपे नितीन सप्रे nitinnsapre@gmail.com  9869375422 091...

स्मृतीबनातून - प्रतिभा पंख( गीतांजली पद्य 2)

इमेज
मी कवी अथवा लेखकही नाही. मी चांगला वेचक मात्र आहे. जे जे चांगलं वेचतो ते ते भावभंग न करता शब्दांद्वारे आपणा समोर मांडण्याचा प्रयत्न करतो. आजवर एकही विपरीत अभिप्राय न देवून आपण माझं धाडस वाढवलं आहे. म्हणूनच गीतांजली या गुरुदेव टागोर यांच्या काव्य संग्रहातील काव्याचा/गीतांचा भावानुवाद करावा अशी आपल्या वाचकां पैकीच काहींनी केलेली सूचना मनावर घेतली आहे. आपले साधक बाधक अभिप्राय महत्त्वाचे आहे गीतांजलीतील हे दुसरे पुष्प. मूळ बंगाली पण रविंद्रनाथांनीच केलेल्या इंग्रजी भाषांतरा वरून केलेला हा मराठी भावानुवाद...ब्लॉग आवडल्यास अन्य मंडळींना तो अग्रेशीत करू शकता. ' When thou commandest me to sing it seems that my heart would break with pride; and I look to thy face, and tears come to my eyes. All that is harsh and dissonant in my life melts into one sweet harmony—and my adoration spreads wings like a glad bird on its flight across the sea. I know thou takest pleasure in my singing. I know that only as a singer I come before thy presence. I touch by the edge of the far spreading wing of my son...

स्मृतीबनातून - वारसा यात्रा(पद्य)

इमेज
देवभूमी हिमाचल प्रदेशाची राजधानी शिमला नगरीचा प्रवास करण्याची इच्छा अचानक फलद्रूप झाली. कडी म्हणजे माझा सहकारी मित्र प्रकाश पंत यानी इतर व्यवस्थे प्रमाणे शिमला-कालका वारसा छोटी रेल्वे आणि पुढे शताब्दी ने माझी दिल्लीला पाठवणी केली. कंडाघाट स्थानका पर्यंत सुचलेले हे पद्य विचार... वारसा यात्रा आज उगवला, दिवस न्यारा शिमला कालका, प्रवास घडला गाडीने छोट्या, लहान केले  साठी मधले, दुसरीत गेले तीस आसनी, डब्यात चढता बदलत गेलो, जागा कितीदा सान थोर, प्रवासी सारे दशम वयाचे, होऊन गेले सात डब्यांची, वारस गाडी वळस रुळांवर, नागीण झाली अगीन राहिली, नव्हती आता पित होती, तेल धावता  प्रथम, द्वितीय, भेद होता समान होता, निसर्ग गारवा दोहो बाजूस, शिवालिक रांगा पहारा हरित प्रेमल  होता सुरू,ओक,देवदार शिपाई देवभूमीची ही बात निराळी चार दिन, प्रकृती सोबत परत फिरता हळवे काळीज नितीन सप्रे nitinnsapre@gmail.com  041020241306 शिमला - कालका

स्मृतीबनातून - अबोला (पद्य 19)

इमेज
  गुरुदेव टागोर म्हणतात तू (परमेश्वर)सध्या माझ्याशी अबोला धरला आहेस. मी शांत राहून धैर्य पूर्वक त्याला सामोरा जाईन. मला खात्री आहे हा अबोला काही कायम स्वरुपी नाही. एक ना एक दिवस तू प्रसन्न होऊन माझ्याशी अबोला सोडशील. तेव्हा आकाशवाणी होऊन तुझे सोनशब्द कानी पडतील. त्यांची सुरेल गाणी होतील आणि पक्षांच्या घरट्यातून ती ऐकू येतील आणि ती गाणी गातच उपवनात फुलं ही उमलतील. If thou speakest not I will fill my heart with thy silence and endure it. I will keep still and wait like the night with starry vigil and its head bent low with patience. The morning will surely come, the darkness will vanish, and thy voice pour down in golden streams breaking through the sky. Then thy words will take wing in songs from every one of my birds' nests, and thy melodies will break forth in flowers in all my forest groves.(Geetanjali song 19) अबोला 1. तू अबोल राहिलास जरी  मौन मी राखीन मनी साहीन सर्व, शांत राहुनी तारकामय रात्रीसम, सदैव जागुनी  धैर्याने वाणीची, वाट पाहूनी उषःकाल, होऊन हा राहील  तमह...