स्मृतीबनातून मृत्यू(पद्य ११६/91)
रवींद्रनाथ टागोर या गीताद्वारे सांगतात की, मृत्यू हा भीतीदायक नसून तो जीवनाचा 'परम सखा' आहे. ज्याप्रमाणे एखादी नववधू आपल्या पतीची आतुरतेने वाट पाहते, त्याचप्रमाणे कवी मृत्यूची वाट पाहत आहेत. जीवनाचा प्रवास संपवून मृत्यूच्या कुशीत विलीन होणे म्हणजे ईश्वराशी एकरूप होणे होय, असा अनेक आध्यात्मिक संदेश यात दिला
116 बंगाली
ओगो मरण, हे आमार मरण, तुमि आमाय कथा कओ।
तपोमय येइ तोमार शरण, तुमि आमाय कथा कओ॥
कतो ये दिन धरे, आमि तोमार पथे-चेये
आछी कतो दुखे सुखे, आछी कतो गान गेये।
तोमार चोखेर एकेकटी निमेषे, आमार सकल कथा
जालिये देबे तोमार चोखेर, एकेकटी निमेषे॥
या-किछु आमार सब तुमि लओ, ओगो मरण, हे आमार मरण।
गूँथा हयेछे फुलेर माला, कबे हबे ये बासर-घरे।
कबे आमि ये याब चले, तोमार साथे निभृत घरे॥
91. इंग्रजी
O thou the last fulfilment of life, Death, my death, come and whisper to me!
Day after day I have kept watch for thee; for thee have I borne the joys and pangs of life.
All that I am, that I have, that I hope and all my love have ever flowed towards thee in depth of secrecy. One final glance from thine eyes and my life will be ever thine own.
The flowers have been woven and the garland is ready for the bridegroom. After the wedding the bride shall leave her home and meet her lord alone in the solitude of night.
मृत्यू
हे मृत्यो! अरे हे माझिया मृत्यू
जीवाची सुफल संपूर्णता तू
ये मजसी कर हितगुज तू
आजन्म जगलो तुझिया साठी
प्रतिक्षेत राहिलो तुझिया लागी
तुझ्या मुळे सुखदुःखाची ओझी
घेऊन भटकलो प्रति दिनी
हे मृत्यो! अरे हे माझिया मृत्यू
ये मजसी कर हितगुज तू
मिळकत, घडण माझी आशा
नकळत सारे तुझिया प्रेमा
मोदित होई भेटून तुजला
तुझिया त्या शुभ कटाक्षी एका
जीवन वधू नित्य अनुगता
हे मृत्यो! अरे हे माझिया मृत्यू
ये मजसी कर हितगुज तू
वरमाले सह सज्ज मन हे
येणार कधी सुहास्य वदने
वर रूपात तू माझिया कडे
त्या दिवशी घर माझे न उरे
कुणीही आप्त वा सखाही नुरे
हे मृत्यो! अरे हे माझिया मृत्यू
ये मजसी कर हितगुज तू
......
नितीन सप्रे
nitinnsapre@gmail.com
110320251020
११६/91

खूप सुरेख पद्यरूपी भावानुवाद केला आहेत आपण. खूपच छान.
उत्तर द्याहटवाये मजशी कर हितगुज तू भन्नाट कल्पना
उत्तर द्याहटवा