स्मृतीबनातून–काव्या(पद्य)

 काव्या

सुदूर रानी प्रभात होता

पुष्पामाजी तेज उजळता 

प्रसन्न हा दिन उगवता

अधरी आली गोड कविता


मनी हासरी स्वप्ने फुलता

​आशेचे हे किरण सांडता 

अंबर तांबूस रंग माखता  

अधरी आली गोड कविता


​धुंदवारा सुखद गारवा 

मृदुलभाव अंगी शहारा

नयनी दिसला प्रेम दुजोरा

अधरी आली गोड कविता


सानकळ्या फुलवंती होता

आसमंत गंधाळून जाता 

मनमयूर नृत्य करता

अधरी आली गोड कविता


​तिजरूपी ध्येय गवसता,

नेणीव ती जाणिवेत येता

कवेत येता शब्दस्वरूपा

अधरी आली गोड कविता


नितीन सप्रे

nitinnsapre@gmail.com 

030320261330

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्मृतीबनातून - हृदयस्थ

स्मृतीबनातून –झूठे नहीं जूठे नैन

स्मृतीबनातून–भाळणे(पद्य)