स्मृतीबनातून – लेखनप्रिया/अक्षरा (पद्य)


लेखन–प्रिया/अक्षरा


काही लिहू लागलो की होती तुझेच भास

काना मात्रा मधून तनुचे तुझ्या आभास


निर्लेप चेहरा तुझा, कोवळा ही असा की

तळ्यातली भूर्जपत्र, मज दिलीत लेखनासी


बिंब भाळीचे, विलसणारे उठावदार

सांगू परी काय, मज भासते अनुस्वार


गौर गाली लांबलेली, बट काळी सुरेख

गमते मला जणू, अक्षरा वरील रेख


रेखीव डोळ्यांवर, भुवयांच्या त्या कोलांट्या

दिसती मला सदा त्या, शब्दांतील वेलांट्या


कुसुमी ओष्ठांवर, वसले नित्य सुहास्य

उलगडे अलवार, ओळींतील  रहस्य


आखीव करकमले, दोन्ही अती सुरेख 

उभी ठाकली जणू ती काना मात्रेचे रुप 


वाचतो जेव्हा स्वये, ही माझीच लेखनकृती

वाटे सदा मला, असे तुझीच देहाकृती


नितीन सप्रे

160520261300



टिप्पण्या

  1. नितीन जी,
    जे न देखे रवी ते देखे कवी.
    तुमच्यातील कवीने किती सुरेख रेखाटले चित्रातील शब्द चित्र.
    वा!
    शब्द आणि चित्र दोन्ही सुरेखं. 🙏💐

    उत्तर द्याहटवा
  2. प्रिय नितीन,
    कदाचित आत्तापर्यंतच्या तुझ्या लिखाणातील एक सर्वांगसुंदर कलाकृती. चेहऱ्यास भुर्जपत्राची कल्पना केवळ अप्रतिम. काव्याचे शीर्षकही अत्यंत समर्पक. तसेच प्रियेचं शब्द रूपी चित्रही खासच. एकूणच कविकल्पना खूप खोलवर रुजली असावी आणि म्हणूनच अत्यंत तरलतेने उफाळून शब्द - चित्र रूपी अवतरलेली दिसते....खूप मस्त. रसग्रहण करताना केवळ धुंदी अनुभवली...

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्मृतीबनातून - हृदयस्थ

स्मृतीबनातून –झूठे नहीं जूठे नैन

स्मृतीबनातून–भाळणे(पद्य)