निसर्गातील छोट्या-छोट्या गोष्टी माणसाला त्याच्या सुंदर भूतकाळात कशा प्रकारे घेऊन जाऊ शकतात, हे वर्डस्वर्थ यांच्या या कवितेतू अनुभवायला मिळतं. कवीच्या धाडसी/आक्रमक वृत्तीच्या विरुद्ध त्याच्या बहिणीचा संवेदनशील आणि हळवा स्वभाव ही वैशिष्ट्ये देखील त्यांनी सुंदर पद्धतीनं चित्रित केली आहेत. कविता वाचताना तिचं मराठी स्वरूप जसं सुचलं ते भावानुवादाद्वारे शब्दांकित केलं आहे.
To A Butterfly
By William Wordsworth
STAY near me—-do not take thy flight!
A little longer stay in sight!
Much converse do I find I thee,
Historian of my infancy !
Float near me; do not yet depart!
Dead times revive in thee:
Thou bring'st, gay creature as thou art!
A solemn image to my heart,
My father's family!
Oh! pleasant, pleasant were the days,
The time, when, in our childish plays,
My sister Emmeline and I
Together chased the butterfly!
A very hunter did I rush
Upon the prey:—-with leaps and spring
I followed on from brake to bush;
But she, God love her, feared to brush
The dust from off its wings.
फुलपांखरास...
थांब जरासा माझ्या जवळी
जाऊ नकोस दूर उडूनी
क्षण काही तू रहा समोरी
वाटे मजला तुजसी बोलू
बालपण ते हळू आठवू
भवती माझ्या धरी फेर तू
आताच नको येथुनी जाऊ
गतवैभव सजीव पाहू
येशी घेऊन रंग मोद तू
हृदयी ती गोड आठवण
बालपणीचा काळ सुखद
ताई सह मागे मी धावत
आवेशाने त्या शिकाऱ्यागत
झुडुपांमध्ये मी झेपावत
काळीज ते दीदीचे कोमल
भीती तीज की उडेल रंगत!
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा