पोस्ट्स

प्रासंगिक - तालेवार संगीतकार - ओ. पी

इमेज
  तालेवार संगीतकार - ओ. पी. जादू नगरीचा जादुगार संगीताचा कुठलाही वारसा नसताना, औपचारिक संगीत प्रशिक्षणही झालेलं नसताना, चित्रपट संगीत रसिकांना चार दशकं आपल्या तालावर नाचवणारा जादू नगरी चा जादूगार म्हणजे संगीतकार ओ. पी. चाकोरीबद्ध, साचेबद्ध एकसुरी संगीतापासून कोसो दूर, श्रवणप्रिय, तालप्रधान गीत रचनांचा बेताज बादशहा म्हणजे ओ. पी. आपल्या अजोड, अवीट ठेकेदार संगीत रचानांनी ओ. पीं. नी हिंदी   चित्रपट संगीताचा आसमंत असा काही दरवळून टाकला की चहाते, बहोत शुक्रिया, बडी मेहेरबानी म्हणते झाले.  ओ. पी. जसे आपल्या भरजरी झगमगीत सांगीतिक कर्तृत्वामुळे लक्षात राहतात तसेच ते आणखी एका गोष्टीमुळे लक्ष वेधून घेतात. हिंदी चित्रपट संगीताच्या अवकाशात सर्वात लयबद्ध आणि सुमधुर संगीत दिग्दर्शकांपैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ओंकार प्रसाद नय्यर  (ओ. पी. नय्यर) सारख्या उत्कृष्ट संगीतकाराने हिंदी चित्रपट सृष्टीच्या अनभिषिक्त स्वरसम्राज्ञी कडून एकही गीत गाऊन घेतलेले नाही आणि म्हणूनच ओ. पी. त्यांच्या उत्तमोत्तम रचनांमूळे जसे नावाजले जातात, तितकेच प्रामुख्यानं लक्षात राहतात ते त्यांच्या  लता ...

प्रासंगिक - जादू नगरी का जादूगर- ओ.पी.

इमेज
  जादू नगरी का जादूगर- ओ.पी. संगीत की ना कोई विरासत, न ही यथारीति तालीम, फिर भी जादू नगरी का यह जादूगर  पचास के दशक से फिल्मसंगीत प्रेमियों को अपनी धुन पर थिरकने को मजबूर कर रहा हैं। हां ठीक समझा आपने, यहाँ ओ.पी. का ही ज़िक्र हो रहा है। एकलयता, एकसुरता, एकरसता सें कोसों दूर, श्रवणप्रिय, तालप्रधान गीत रचनाओं का बेताज़ बादशाह मतलब ओ. पी.। अपनी अनोखी और रसभरी संगीत रचनाओं से ओ.पी. ने हिंदी सिने संगीत के बग़ीचे को ऐसा महका दिया की चाहनेवालों के दिल कहने लगे…. बहुत शुक्रिया, बडी मेहरबानी…. ओ. पी. को जिस तरह शानदार गीतों के लिये, संगीत उपलब्धियों के लिए याद किया जाता है, उसी तरह उन्हें किसी और बात के लिए भी याद किया जाता है। हिंदी फिल्म संगीत के सबसे लयबद्ध और मधुर संगीत निर्देशकों में से एक के रूप में जाने जानेवाले ओंकार प्रसाद नैय्यर (ओ. पी. नैय्यर) जैसे महान संगीतकार ने, हिंदी फिल्म जगत की सूर साम्राज्ञी से, एक भी गीत नही गवायां। ओ.पी. जितना ही अपनी बेमिसाल संगीत रचनाओं के लिए जाने जाते हैं, उतने ही लताजी के बिना भी, सफल करिअर के लिये जाने जाते हैं। ओ.पी. का मानना था की लता मंगेशकर ...

स्मृतिबनातून - ' श्वाना घरचे समर्थ '

इमेज
  ' श्वाना घरचे समर्थ ' तो घरी आला तो काहीश्या प्रतिकूल परिस्थितीतच. आई - बाप, भावंडांना सोडून आलेला तो  भेदरलेल्या मनस्थितीत होता. साहजिकच होतं, या आधी दोन घरे सोडून झाली होती आणि तेही  जन्मानंतर दोन महिन्याच्या आतच. बरं हे तिसरं जगही, त्याच्या आगमनावरून, दोन समान गटात विभागलेलं. मुलाची तीव्र इच्छा असल्याचे सांगून माझ्याकडून होकार सदृश संमती मिळावी यासाठी रदबदली करणारी त्याची  आई आणि माझ्या दृष्टीने या समस्येचा मुळ पुरूष मुलगा; यांचा एक अभेद्य गट. संख्याबळाच्या निकषा वर तोडीसतोड वाटणारा, पण मुळातच दुय्यम, दुबळा असलेला; मुलगी आणि मी असा दुसरा गट. त्यातच स्त्रीसुलभ प्रवृत्तीने म्हणा माझ्या गटातील महिला सदस्याने लवकरच अनपेक्षितरित्या गटांतर केलं आणि माझ्यावर गंडांतर आलं. अर्थात मी एकाकी पडलो तरी एकनिष्ठता, तत्वनिष्ठता वगैरे गुण (?) दाखवत एकांड्या शिलेदारा प्रमाणे त्यांच्या विरोधात किल्ला लढवत राहिलो. त्याची परिस्थिती ही केविलवाणी होती. नवीन जागा. नवे संबंधी. आपले सहानुभूतीदार नेमके कोण याची त्याला अजून उमजच यायची होती. पहिल्या रात्री, कुणावर भरवसा ठेवावा ही चिंता त्या...

प्रासंगिक - ईशअंशी गीतयोगी

इमेज
ईशअंशी गीतयोगी  स्वनामधन्य स्व नामधन्यता ज्या काही विरळ व्यक्तिमत्त्वांच्या भाग्याला येते त्यात गजानन दिगंबर कुलकर्णी  हे नाव प्रकर्षाने अग्रस्थानी आढळते. सांगली जिल्ह्यातलं शेटेफळ हे जन्म गाव पण बालपण गेलं ते औंध संस्थानातल्या पाच सहाशे लोकवस्तीच्या माडगूळ या गावी. हा कलंदर कलाकार आपल्या नावात, गावाच नावही गुंफतो आणि ते अजरामर करतो. आपली ओळख सांगताना माडगूळकर लिहून  जातात….. ' ज्ञानियाचा वा तुक्याचा तोच माझा वंश आहे माझिया रक्तात थोडा ईश्वराचा अंश आहे...'  अन्य कुणाच्या तोंडी खचितच दर्पोक्ती पूर्ण वाटेल अशी संकल्पना महाराष्ट्राच्या या आधुनिक वाल्मिकीच्या तोंडी मात्र सहज शोभून दिसली. यथार्थ वाटली. त्यांच्या प्रतिभेचा फुलोराच एव्हढा अचाट करणारा होता की जणूकाही पुष्पवाटिकेत, रंगगंध युक्त सर्व प्रकारची फुलं, एकाच झाडाच्या निरनिराळ्या शाखांना उमलावित.  अंकांच गणित न जमलेल्या गदिमांना शब्दांच्या गणितानं असा काही हात दिला की ते रसिकांच्या हृदयात कायम स्वरुपी अंकित झाले. माडगूळकर चतुरस्र प्रतिभेचे धनी होते. लेखक, कवी, गीतकार, अभिनेते, नेते(विधान परिषदेचे नामनियुक्त स...

प्रासंगिक-कोरोना काळातील निवडणुका

इमेज
  कोरोना काळातील निवडणुका लोकतांत्रिक राज्य पद्धतीत निवडणुकांना अनन्य साधारण महत्व आहे.  निवडणूक म्हणजे एकप्रकारे लोकशाहीचा उत्सव. लोकशाहीतला एक मोठा सण. येत्या काही दिवसात जगातल्या दोन सर्वात मोठ्या लोकतांत्रिक राज्य व्यवस्था, वेगवेगळ्या स्तरावर च्या लोकमत चाचणीला सामोऱ्या जात आहेत. पहिली निवडणूक देशांतर्गत म्हणजेच बिहार विधानसभेच्या २४३ जागांसाठी होते आहे तर सर्व जगाच लक्ष वेधून घेणारी दुसरी मोठी निवडणूक अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदा साठी होते आहे. जगावर कोरोना संकट कोसळल्या नंतर या विपदेच्या छायेत होणाऱ्या या दोन महत्वाच्या  निवडणुका आहेत. साहजिकच या अनुषंगाने सर्वसामान्य परिस्थितीत केल्या जाणाऱ्या प्रबंधनापेक्षा अधिक अशी व्यवस्था निवडणूक यंत्रणेला करावी लागली आहे.  बिहार विधानसभा निवडणूक कोरोना संकटाच्या छायेत होत असलेली भारतातील ही सर्वात मोठी पहिलीच निवडणूक आहे. बिहार विधानसभेच्या २४३ जागांसाठी एकूण तीन टप्प्यात ही घेतली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात २८ऑक्टोबर २०२० रोजी ७१ जागांसाठी, दुसऱ्या टप्प्यात ९४ जागांसाठी ३ नोव्हेंबर ला तर तिसऱ्या आणि अंतिम टप्प्यात ७ नो...

प्रासंगिक - कोरोना काल के चुनाव

इमेज
  कोरोना काल के चुनाव लोकतांत्रिक राज्य प्रणाली में चुनावों का एक विशेष असाधारण महत्व है। चुनाव एक तरह से लोकतंत्र का उत्सव है। लोकतंत्र का एक बड़ा त्योहार। अगले कुछ ही दिनों में, दुनिया के दो सबसे बड़े लोकतंत्र, विभिन्न स्तरों पर जनमत को  आजमाने जा रहे हैं। पहला चुनाव बिहार विधानसभा की 243 सीटों के लिए है, जबकि दूसरा प्रमुख चुनाव  अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पद के लिए है। कोरोना संकट का कहर विश्व भर में फैलने के बाद, उस आपदा की छाया में ये दो महत्वपूर्ण चुनाव हो रहे हैं। स्वाभाविक रूप से, चुनावी प्रबंधन को सामान्य परिस्थिति की तुलना में इस संबंध में अधिक व्यवस्था करनी होगी। बिहार विधानसभा चुनाव कोरोना संकट की छाया में भारत में होने वाला यह पहला बड़ा चुनाव है।बिहार विधानसभा की 243 सीटों के लिए तीन चरणों में चुनाव की ये जा रहे हैं।  पहले चरण में 28 अक्ट्टूबर, 2020 को 71 विधानसभा क्षेत्र में मतदान होगा।   दूसरा चरण 3 नवंबर को 94 सीटों के लिए और तीसरा चरण 7 नवंबर को शेष 78 सीटों के लिए आयोजित किया जाएगा। मतों की गिनती 10 नवंबर, 2020 को होगी और परिणाम उसी दिन घोषित...