पोस्ट्स

स्मृतीबनातून - ओळख(पद्य)

इमेज
ओळख काय सांगू काय झाले संकटे जैसी चालुन आली मुखवटे गळाले ओळख खऱ्या चेहऱ्यांची झाली मागितले दान नव्हते कुणाला  तोवरी सारेच दानशूर होते मागता फक्त धीर थोडा  तुडतुडे शब्दांचे सोडले होते होता मार्ग सुखाचा तेव्हा सह प्रवासी सारेच झाले आणुनी आड वाटे वर सगळे एकटे सोडून गेले कळपात जंगली प्राणी मात्रांच्या काही पाळीव होते भासले  होऊन नागवी चारित्र्ये  ते पाशवी ठरले होते नितीन सप्रे nitinnsapre@gmail.com  130720241900 घोलवड 

स्मृतीबनातून - निशब्द कृती (पद्य)

इमेज
निशब्द कृती उघड्या नेत्रांस जाळी दाहकता वास्तवाची  मिटल्या पापण्यात दाटी भंगलेल्या स्वप्नांची भरून होते घेतले श्वास त्यांनी अमृताचे कळेना निःश्वास त्यांचे हे कैसे झाले विषाचे  अधरांवरचे जे प्राशिले शीतल चांदणे अवचित त्यांचे कैसे होऊन गेले निखारे स्पर्शात खास होती अशी जाणीव धुंदगंध गेला उडून आता तो रासलीलेचा सुगंध दुखावल्या भावना त्यांच्या निमित्त काही शब्द केली राख जीवनाची करुनी कृती निशब्द रूप रंग ऐहीकाचे सारे ते भुलविणारे हाक देती संग अलौकिकाचे उजळणारे नितीन सप्रे nitinnsapre@gmail.com  230420241140

स्मृतीबनातून - अलक्षीत कवी

इमेज
अलक्षीत कवी वैद्यक क्षेत्राशी संबंधित अनेकांनी साहित्य आणि संकृतीच्या प्रांतातही ध्यानाकर्षण होईल अशी उत्तम कामगिरी केली आहे. महाराष्ट्रा पुरतं बघायचं झालं तर सर्वश्री डॉक्टर श्रीराम लागू, काशिनाथ घाणेकर, मोहन आगाशे, गिरीश ओक, सलील कुलकर्णी अशी नाव पटकन डोळ्यापुढे येतात. कलेच मनाशी फार जवळच नातं आहे असं मला नेहमीच वाटतं. मनाचा शोध हा तसा आत्यंतिक गहन विषय आहे. वैद्यकशात्राचा अभ्यास करणाऱ्या मंडळींना मानवी शरीराची जडण घडण शिकत असताना त्याच्या मना कडे जाणाऱ्या गुप्त वाटेचा ही पत्ता मिळत असावा. जो जितका या वाटेवर अधिक वाटचाल करेल त्याला त्याप्रमाणात रसिकांच्या मनाची ओळख होत असावी. शरीर प्रकृतीतल्या विकृती जाणून घेण्यासाठी कराव्या लागणाऱ्या नाडी परीक्षेच्या सरावामुळे रसिकांची नाडी सुद्धा त्यांच्या हाती येत असावी असा आपला माझा एक तर्क आहे. इथे हा सगळा उहापोह करण्याचं कारण म्हणजे माझ्या शालेय दिवसां पासून कानावर पाडणारं एक अत्यंत गोड गीत. कोकीळ सुद्धा हेवा करील असा अत्यंतिक गोड गळा आणि जोडीला आकर्षक चाल यामुळे त्याकाळी या गीतानी मनात कधी कसा शिरकाव केला ते कळलंच नाही. पुढे ही हे गीत अन्य गीत...

स्मृतीबनातून निरंजनी स्वर-माणिक

इमेज
  निरंजनी स्वर-माणिक  पहिली भेट दिनांक,दिवस,महिना आठवत नाही पण ऑक्टोबर १९९१ ते ऑक्टोबर १९९२ या कालावधी दरम्यानची ही घटना. आकाशवाणी भोपाळ मधल्या श्रोता अनुसंधान विभागातली माझ्या पहिल्या नोकरीचा राजीनामा देऊन मी  आकाशवाणी मुंबई इथे कार्यक्रम विभागात रुजू झालो होतो. त्या दिवशी सकाळी साडे नऊच्या सुमारास मी नव्या आमदार निवास समोरच्या आकाशवाणी भवनात प्रवेश केला की अलीबाबाच्या गुहेत? असा प्रश्न मला पडला. तिळा तिळा दार उघड न म्हणता अलीबाबाची अफाट संपत्ती असलेली गुहा उघडावी किंवा अल्लादिनचा जादूचा दिवा न घासताही जीन प्रकट व्हावा तशी माझी स्थिती झाली. आत शिरताच सहज म्हणून डावीकडच्या अतिथी कक्षाकडे मान फिरवली. तिथे अगदी सामान्य वेशभूषेत बसलेल्या एका व्यक्ती वर नजर स्थिरावली. त्यांना कुठेतरी पाहिल्या सारखं वाटलं म्हणून मी ही तिथे गेलो. वयाच्या साधारण सहा सात वर्षां पासून आजवर सतत ऐकून मनावर मुद्रित झालेली, ‘अनंता अंत नको पाहू’, ‘अमृताहूनी गोड’, ‘त्या सावळ्या तनुचे’, ‘क्षणभर उघड नयन देवा’, ‘नका विचारू देव कसा’, ‘घन निळा लडिवाळा’, ‘कबिराचे विणतो शेले कौसल्येचा राम’, ‘विजय पताका श्रीराम...

स्मृतीबनातून - जिवलगा(पद्य)

इमेज
आठवणींच्या मेघातून मन विचरण करत असताना अवचित शीतल समिराच्या झुळकी पाठोपाठ सरसर आलेल्या वर्षा धारांनी काहीसं मलूल झालेलं मन  टवटवित होऊन गुणगुणू लागलं... जिवलगा अंतरातून  आज कुणी साद घाली जिवलगास खिन्नता अशी कुणास काजळी जशी दिव्यास तितुक्यात समिरा सह चंदनी आली झुळूक शुष्क उपवनास त्या फुलण्याची साद देत मिळता दव संजीवन सर्वत्र आला बहर कुसुमी ओला सुवास तरूवर गाती विहंग विखुरला चांदणं प्रकाश सावळ तो आसमंत तरू छायेत दिसे मीरे सह मनमोहन नितीन सप्रे nitinnsapre@gmail.com 040420241815 मथुरा

स्मृतीबनातून - कैवल्य चांदणे(पद्य)

इमेज
  कैवल्य चांदणे या नदीच्या पार तेथे, गाव माझे छानसे सोडूनी भवबंध आता मुक्त व्हावे असे कहाण्या सांगू किती, काहीच ना तिथे उणे सांगतो दूर त्या पासून ना आता राहणे गावी माझ्या वाहती, स्फटिका सम निर्झरे गर्द तरुराजीत त्या, कूजती मधू पाखरे क्षितिजी निरांजन भास्कराचे ते तेवते तारकांची शीतल आभाळमाया दाटते सांज वेळी खग हे निघाले घरट्याकडे कुडीतल्या प्राणा जाऊया निज धामा कडे घेतला आस्वाद सारा मायेच्या विभ्रमांचा दाटेल सुख बघता चेहरा स्वरूपाचा शिणवितो का जीव त्याग ऐहिक भोगणे एक असो आस लाभावे कैवल्य चांदणे नितीन सप्रे nitinnsapre@gmail.com 2703242237 या नदीच्या पार तेथे, गाव माझे छानसे सोडूनी हे  भवबंध  आता, मुक्त विसावे असे कहाण्या सांगू किती, काहीच ना तिथे उणे सांगतो  मनी,  त्यावाचून आता ना राहणे गावात माझ्या वाहती,  स्फटिकासम निर्झर गर्द तरुराजीत त्या, कूजती  मधु-पाखर क्षितिजी  निरांजन भास्कराचे  ते तेवते तारकांची  शितल छाया  आभाळी दाटते सांजवेळी हे खग निघाले, आपुल्या घरट्याकडे कुडीतल्या प्राणा  चल  जाऊया, निजधामाकडे घेतला आस्...

स्मृतीबनातून - देखण्या ‘बाकी’ काव्यपंक्ती

इमेज
देखण्या ‘बाकी’ काव्यपंक्ती उपोध्दात कवी कोणाला म्हणायचं? जो कविता करतो तो कवी असं रूढार्थाने मानलं जातं. मात्र जो कविता करतो, तो कवी नसतो असं मराठी सारस्वतातील चोखंदळ रसिक खेळिया म्हणजेच पु.ल. देशपांडे यांनी एके ठिकाणी म्हटलं आहे. ते वास्तवही असावं. खऱ्या कवीच्या अंतरंगात काव्य बीज मुळातच असतं आणि शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी या उक्ती नुसार सरस्वतीच्या कृपेनं ते बीज कधीतरी अंकुरतं. काही सुदैवी संवेदनशील सुजाणांच्या बाबतीत त्यातूनच आशय लोभस काव्यवेल बहरते. गोव्याच्या कुडचडे इथे जन्मलेले बोरी गावाचे बाळकृष्ण भगवंत बोरकर म्हणजेच बा.भ. बोरकर उपाख्य बाकीबाब हे शारदेच्या कृपा प्रसादाला पात्र ठरलेले असेच एक सुदैवी, सुजाण आणि काव्यासक्त कवी होते.  काव्य स्फुर्ती बोरकरांच्या कविता वाचताना त्या त्यांनी केल्या असं न वाटता त्या प्रगटल्या असंच प्रकर्षानं जाणवतं. दूरदर्शनवर झालेल्या एका कार्यक्रमात स्वतः बोरकरांनी काव्य स्फुर्तीचा किस्सा सांगितला होता. अगदी लहानपणा पासून त्यांच्या कानावर विविध प्रकारे कवितेचे संस्कार आपसूक घडतं होते. त्यांच्या घराण्यात पिढ्यानपिढ्या असलेली भजन परंपराही त...