स्मृतीबनातून –आत्मशोध(काव्य)
आत्मशोध
भेटू नये वाटे, आताशा कुणाला
भेटावे आपुल्यातील आपल्याला
जे भेटले, चेहरा वाचत गेले
मन ते अनोळखी राहून गेले
उपयोग काय, या परिचयाचा
अश्रू न टिपे, तो शेव परक्याचा
असता वेढा भोवती, कृतघ्नांचा
धावाही निष्फळ ठरे, देवतेचा
दुःख इतरांस, सांगावे कशाला
क्षेम अपुले, पुसावे आपणाला
नितीन सप्रे
25062026

खरच आहे. आपण आनंद वाटावा.
उत्तर द्याहटवासुरेख कविता.