स्मृतीबनातून –आत्मशोध(काव्य)







आत्मशोध

भेटू नये वाटे, आताशा कुणाला

सांगतो, सदैव भेटावे स्वतःला


जे भेटले, चेहरा वाचत गेले

मन माझे, ते अनोळखी राहिले


काय उपयोग, या परिचयाचा

अश्रू न टिपे, तो शेव परक्याचा 


असता वेढा भोवती, कृतघ्नांचा

धावाही निष्फळ ठरे, देवतेचा


इतरास दुःख, सांगावे कशाला

क्षेम अपुले, पुसावे आपणाला


 नितीन सप्रे

25062026

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा