स्मृतीबनातून – प्रीतरीती (काव्य)

आषाढ सरींच्या पार्श्वभूमीवर बेगम अख्तर यांनी गायलेली शकील बदायुनी यांची सुप्रसिद्ध गझल 'ए मोहोब्बत तेरे अंजाम पे रोना आया’ ऐकताना मनात उमटलेले मराठी रूप.


प्रीतरीती


प्रीती तुझ्या रीतीने आज डोळे भरून आले

न जाणे स्मृतीने तुझ्या का डोळे भरून आले?


वाट पाहताना तुझी ढळते सांज रोज

आज सांजेला का पुन्हा डोळे भरून आले?


कधी नशिबाचा दगा कधी तक्रारी जगाच्या

प्रेमात पावलो पावली डोळे भरून आले


जेव्हा कधीही जगी या होते स्मरण प्रितीचे

मात प्रेमातली स्मरून डोळे भरून आले


नितीन सप्रे

150720262315


टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्मृतीबनातून - हृदयस्थ

स्मृतीबनातून–भाळणे(पद्य)

स्मृतीबनातून –झूठे नहीं जूठे नैन